PhonePe HDFC Ultimo Credit Card Pudhari
पुणे

Credit Card: फोनपे-HDFC अल्टीमो कार्ड; रिचार्ज, UPI स्कॅन-अँड-पे आणि ऑनलाइन शॉपिंगवर मिळवा भरघोस रिवॉर्ड्स

PhonePe आणि HDFC Bank यांनी ‘फोनपे HDFC अल्टीमो क्रेडिट कार्ड’ आणले आहे. हे कार्ड रोजच्या खर्चांवर रिचार्ज, युटिलिटी बिले, स्कॅन-अँड-पे आणि ऑनलाइन शॉपिंग, थेट कॅशबॅक देत आहे.

पुढारी वृत्तसेवा

PhonePe HDFC Ultimo Credit Card: डिजिटल पेमेंट्सच्या दुनियेत आघाडीवर असलेल्या PhonePe ने गेल्या वर्षी जून महिन्यात को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड क्षेत्रात प्रवेश केला होता. आता HDFC Bank सोबत लाँच करण्यात आलेले ‘फोनपे HDFC अल्टीमो क्रेडिट कार्ड’ रोजच्या खर्चावर थेट रिवार्ड पॉइंट्स देणारे कार्ड म्हणून ओळखले जात आहे.

सध्या क्रेडिट कार्ड वापरणारे ग्राहक केवळ मोठ्या खरेदीवरील ऑफर्सपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. दैनंदिन खर्च जसे की मोबाईल रिचार्ज, वीज-पाणी बिल, ब्रॉडबँड, किराणा खरेदी यावरही फायदा मिळावा, अशी त्यांची अपेक्षा असते. फोनपे HDFC अल्टीमो कार्ड नेमकी हीच गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.

या कार्डची संकल्पना अतिशय सोपी आहे. गुंतागुंतीचे रिवार्ड पॉइंट्स, कॅटेगरीमधील बदल किंवा अटी न ठेवता, रोजच्या वापरातील खर्चावर थेट कॅशबॅक देणे, हा या कार्डचा मुख्य उद्देश आहे. फोनपे अ‍ॅपवरील महत्त्वाच्या कॅटेगरीजमध्ये जसे मोबाईल रिचार्ज, DTH सबस्क्रिप्शन, युटिलिटी बिले आणि इतर दैनंदिन पेमेंट्स, या कार्डवर 10 टक्के कॅशबॅक मिळतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे नियमित बिल भरतानाच ग्राहकांना मोठा फायदा होतो.

याशिवाय, भारतात मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या QR कोड पेमेंट्सनाही या कार्डने रिवॉर्ड्सच्या कक्षेत आणले आहे. फोनपेच्या ‘स्कॅन अँड पे’ व्यवहारांवर 1 टक्का कॅशबॅक मिळतो. गल्लीतील किराणा दुकान, भाजीवाला, चहाची टपरी किंवा स्ट्रीट फूड विक्रेता, प्रत्येक ठिकाणी केलेला छोटासा खर्चही आता कॅशबॅकमध्ये रूपांतरित होतो. लहान-लहान व्यवहारांवरही ग्राहकांना फायदा देणे, हे या कार्डचे वैशिष्ट्य मानले जात आहे.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठीही फोनपे HDFC अल्टीमो आकर्षक आहे. फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर निवडक ऑनलाइन ब्रँड्सवर 5 टक्के कॅशबॅक देण्यात येतो. यासोबतच, या कार्डवर मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस मिळत असल्याने, प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठीही हे कार्ड उपयोगी ठरत आहे.

रोजच्या खर्चावर लक्ष केंद्रित केल्यामुळे या कार्डची मागणी वाढत आहे. मोठ्या खर्चाच्या अटी न ठेवता, नियमित व्यवहारांवर थेट फायदा देण्याची सुविधा ग्राहकांना अधिक व्यवहार्य वाटत आहे. त्यामुळे हे कार्ड केवळ प्रीमियम खरेदीसाठी नव्हे, तर दैनंदिन वापरासाठीही उपयुक्त ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT