Cradit Card POS Scam: सावधान! क्रेडिट कार्ड खिशात असतानाही होऊ शकतो 'स्कॅम'

Anirudha Sankpal

सायबर ठग गर्दीच्या ठिकाणी चोरून 'पॉईंट ऑफ सेल' (POS) मशीनचा वापर करून खिशातील कार्ड स्कॅन करून पैसे चोरत आहेत.

वाय-फाय सुविधेमुळे कार्ड मशीनच्या संपर्कात येताच २-३ सेकंदात व्यवहार पूर्ण होतो आणि पीडिताला कळेपर्यंत पैसे कट झालेले असतात.

यापासून वाचण्यासाठी तुमच्या बँकिंग ॲपवर जाऊन 'कॉन्टॅक्टलेस पेमेंट' किंवा 'NFC' सुविधा तातडीने बंद करा.

जर तुम्हाला ही सुविधा वापरायची असेल, तर त्याची दैनंदिन मर्यादा (Limit) कमीत कमी म्हणजे १,००० रुपयांपेक्षाही कमी सेट करा.

सुरक्षेसाठी 'RFID-Blocking Wallet' किंवा विशेष कार्ड होल्डरचा वापर करा, ज्यामुळे मशीन तुमच्या कार्डाचे सिग्नल पकडू शकणार नाही.

तुमचे कार्ड नेहमी पाकीटात अशा प्रकारे ठेवा की ते बाहेरील स्पर्श किंवा स्कॅनिंगला लगेच प्रतिसाद देणार नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता बँकेला कळवून आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ब्लॉक करा.

सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी 'संचार साथी' पोर्टल किंवा नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइनचा (१९३०) आधार घ्या.

सतर्क राहून तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित ठेवणे, हाच या आधुनिक डिजिटल चोरीपासून वाचण्याचा प्रभावी मार्ग आहे.

येथे क्लिक करा