पाटस: दौंड तालुक्यातील पाटस परिसरात घरगुती गॅस सिलिंडर वितरणामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गॅस वितरकांकडून होणारा काळाबाजार, अवैध वाहतूक आणि नियमबाह्य विक्रीमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग््राामस्थांनी केली आहे.
अनेक ग््रााहकांनी ऑनलाइन बुकिंग करूनही त्यांना वेळेत सिलिंडर मिळत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षात सिलिंडर हातात पडण्यापूर्वीच ऑनलाइन प्रणालीमध्ये ‘डिलिव्हरी पूर्ण’ झाल्याची नोंद दिसत आहे. भारत गॅसच्या एका ग््रााहकाने मार्च महिन्यात बुकिंग करूनही त्यांना सिलिंडर मिळाला नाही; मात्र, कागदोपत्री तो वितरित झाल्याचे दाखवण्यात आले. यावरून ग््रााहकांच्या नावावर असलेल्या सिलिंडरचा परस्पर गैरवापर होत असल्याचा संशय बळावला आहे.
घरगुती वापराचे अनुदानित सिलिंडर हॉटेल आणि इतर खाद्य व्यवसायांमध्ये छुप्या पद्धतीने वापरले जात असल्याचे बोलले जात आहे. पाटससह कुसेगाव, कुरकुंभ, वरवंड आणि दौंड परिसरात क्षमतेपेक्षा जास्त सिलिंडरची अवैध वाहतूक केली जात आहे. कडक उन्हात नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.
पाटसच्या विकासाचा बोजवारा
दौंड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पाटस गावाच्या विकासाचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. ‘गावचा विकास’ या गोंडस नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च होत असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात गावाची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. ग््राामपंचायत प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे जनतेच्या पैशांची सर्रास नासधूस होत असल्याची भावना ग््राामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत गावात कचऱ्याचे ढीग, उखडलेले रस्ते आणि तुंबलेल्या गटारींमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक विकासकामे केवळ कागदावरच पूर्ण झाली असून, प्रत्यक्षात ती अर्धवट किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. नव्याने केलेले रस्ते काही महिन्यांतच उखडल्याने ठेकेदारी आणि कमिशनखोरीच्या चर्चेला उधाण आले आहे.
काही नेते केवळ स्वतःची आर्थिक पोळी भाजण्यात मग्न असून, राजकीय आश्वासनांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने या सर्व कामांची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा आगामी काळात ग््राामस्थांच्या तीव रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पाटसकरांनी दिला आहे.
नागरिकांचे प्रमुख सवाल
जनतेच्या करातून जमा होणारा पैसा नेमका कोणाच्या खिशात जात आहे?
निकृष्ट दर्जाच्या कामांना मंजुरी देणारे अधिकारी आणि पदाधिकारी कोण?
ऐतिहासिक पाटस गावाला मूलभूत सुविधांपासून वंचित का ठेवले जात आहे?
पाटस परिसरातील गॅस विक्रीबाबतच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संबंधित गॅस एजन्सींच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर शासकीय नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.योगेश सकट, पुरवठा अधिकारी