पुणे

‘घोडगंगा’विरोधातील पाचंगे यांचे उपोषण मागे

Laxman Dhenge

शिरूर : पुढारी वृत्तसेवा: घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यासाठी 27 डिसेंबर 2023 पासून धरणे आंदोलन व 2 जानेवारीपासून कारखान्याचे समोर उपोषण आंदोलनाला बसलेले भाजप उद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांनी कागदपत्रे दिल्यानंतर चौकशीचे व कार्यवाहीचे लेखी आश्वासाचे पत्र मेलवरून प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांनी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते लिंबु पाणी घेऊन उपोषण सोडले.

या बाबत संजय पाचंगे यांनी सांगितले कि आमदार अशोक पवार व खासदार अमोल कोल्हे यांनी कारखान्याचे कर्ज रोखले असे सातत्याने आरोप केले होते. परंतु कारखाना जाणिवपुर्वक बंद करण्याचा डाव आम्ही उघडकीस आणला आहे. कारखान्यावर एकुण किती कर्ज आहे याची माहिती त्यांनी दिली.त्यानुसार 21 डिसेंबर 2023 पर्यंत 135 कोटी रुपये मुद्दल कर्ज असल्याचे लेखी दिले आहे. त्यावरील व्याजाची रक्कम वेगळी आहे असे त्यात नमुद केले आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त 135 कोटींचे कर्ज घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर असेल तर कारखाना अडचणीत नाही हे स्पष्ट झाले आहे.

तसेच फक्त 135 कोटी रुपयांचे कर्ज असेल तर कारखान्याची कर्ज उचलण्याची क्षमता संपलेली नाही. मग कारखान्याला कर्ज मिळत नाही ही सबब खोटी ठरत आहे. घोडगंगाचे कार्यकारी संचालकांनी जाहीर सांगितले की घोडगंगाने मागितलेले कर्ज रोखलेले नाही. शिवाय 35 कोटी रुपये राज्य सहकारी बँकेने कारखाना सुरू करण्यासाठी दिले असताना ते कर्ज कारखाना सुरू करण्यासाठी वापरले नाही. त्यामुळे कारखाना सुरू झाला नाही.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र निंबाळकर, ग्राहक पंचायतीचे शिरुर तालुका अध्यक्ष संपतराव फराटे, प्रगतीशील शेतकरी ठकसेन ढवळे, जेष्ठ नेते गणपतराव फराटे, भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, सुरेश साळुंखे, उत्तम जगताप, घोडगंगा कामगार संघटनेचे अध्यक्ष नाना मासाळ, भाजपचे सागर फराटे, परशुराम मचाले, शांताराम पाचंगे, आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT