सर्व जबाबदारी सरकारी विभागांची : निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीचा खुलासा | पुढारी

सर्व जबाबदारी सरकारी विभागांची : निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीचा खुलासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सरकारने तयार केलेल्या अंदाज पत्रकाप्रमाणे कंत्राटदार काम करत असतो आणि त्यावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍याचे पूर्ण नियंत्रण असते. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होते की नाही पाहण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे,असे पारगाव-चौफुला रस्त्याचे काम करणार्‍या निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीने कळविले आहे. गेली एक वर्षभर रस्त्या लगतच्या स्थानिक शेतकर्‍यांनी कामे थांबवली आहेत. त्या शेतकर्‍याच्या प्रश्नांचे निरकरण करणे हा त्या संबंधित विभागाचा विषय आहे.

शेतकर्‍यांचे समाधान करण्याचा किंवा त्याला कुठलेही आश्वासन देणे अथवा नुकसानभरपाई देणे हे काम सरकारचे आहे असे नमूद करत निखिल कंन्ट्रक्शन कंपनीने पारगाव-चौफुला रस्त्यातील अडचणी संदर्भातील सर्व जबाबदारी सरकार विभागांची आहे असे स्पष्ट केले आहे. शेतकरी आणि संबंधित विभागाचे अजून पर्यंत संगनमत झालेले नाही त्यामुळे काम थांबते आहे. यात कंपनीचा कसलाही, कुठलाही दोष नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.या रस्त्याची संपुर्ण मोजणी शासकीय आहे व शासकीय मोजणी अधिकार्‍यामार्फत केलेली आहे.

रस्ता खोदल्या नंतर धूळ हि होतंच असते.त्याला पाणी सारखे लागते याची पूर्ण जाणीव कंपनीला आहे. काम चालू होण्या अगोदर निविदा निघते, त्याला प्लॅन असतो, त्यासाठी येणार्‍या खर्चाचे अंदाज पत्रक होते, आणि त्या नंतर कामाचे टेंडर होते,असेही कंपनीने म्हटले आहे.
आमचे काम संथ गतीने सुरु आहे, काही ठिकाणी फक्त रस्ता खोदून ठेवला जात आहे. रस्त्यावर पाणी मारले जात नाही, स्थानिक लोकांना माहिती व्यवस्थित दिली जात नाही. रस्त्याची खोली, लांबी, रुंदी आम्हाला समजत नाही.आमच्या कंपनीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे असा उल्लेख कंपनीने पत्रात केला आहे.

या स्थानिक लोकांच्या तक्रारी दै.’पुढारी’ ने मांडल्या आहेत,परंतु कंपनीच्या पत्रात ते दै.’पुढारी’चे मत असल्याचे दणकुन सांगण्यात आले आहे. बातमीमध्ये तसे स्पष्ट उल्लेख आहेत,तरी ही त्याकडे दुर्लेक्ष करून कंपनीने आपले मत मांडले आहे.
काम थांबल्यामुळे कंपनीचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कंपनीची यंत्रसामग्री (मशीनरी) उभी राहत आहे. संबंधित कामगारांचा पगार हा कंपनीला भरावा लागत आहे.निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रा. लि. या कंपनीची हजारो कोटी रुपयाची विकास कामे महाराष्ट्राभर सुरु आहेत,असेही कंपनीने म्हटले.

हेही वाचा 

Back to top button