पुणे

पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे आदेश जारी : असे असतील बदल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरिता पुणे शहरातील सिंहगड व येरवडा वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचे तात्पुरते आदेश आणि कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत अंतिम आदेश जारी करण्यात आले आहेत.
सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत विजयनगर चौक ते चव्हाण शाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर उजव्या बाजूस 30 मीटर, विजयनगर चौक ते धायरेश्वर मंदिर व कामठे यांच्या पेट्रोलपंपाकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन्ही बाजूस 30 मीटर अंतरापर्यंत, श्री व्यंकटेश वृंदावन सोसायटी, नवले ब्रीजजवळ, बडगाव बु. पुणेच्या गेटपासून उजव्या बाजूस 50 मीटर, भन्साळी कॅम्पस सहकारी गृहरचना मर्या. सोसायटी, वडगाव बु. मेन गेटपासून डावीकडे 15 मीटर व उजवीकडे 15 मीटर तसेच येरवडा वाहतूक विभागांतर्गत सेलेब्रियम आयटी पार्क बिल्डींग नं. 3 ते मेरीगोल्ड सोसायटी रोडपर्यंत 400 मीटरचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सूचना व हरकती 25 फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात, असे पोलिस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.

कोरेगाव पार्कमध्ये नो-पार्किंग, नो-हॉल्टिंग

कोरेगाव पार्क वाहतूक विभागाच्या वतीने शहरातील पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटी गेटपासून क्लोवर पार्क सोसायटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो-पार्किंग, नो-हॉल्टिंग करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आल्याचेही कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT