पुणे

पुणे : ऑनलाइन पैसे पाठविल्याचे दाखवत फसवणूक करणारा अटकेत

अमृता चौगुले

सासवड : पुढारी वृत्तसेवा

सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करून त्याचे पैसे गुगल पे आणि फोन पे केल्याचे खोटे मेसेज दाखवून फसवणूक करणाऱ्याला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. विशाल माणिक घोडके (वय २८, रा. होलेवस्ती, उंड्री, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत सासवड येथील राजभी ज्वेलर्सचे मालक श्रीपाल भिकमचंद ओसवाल (रा. सोपाननगर, सासवड) यांनी शुक्रवारी (दि. ११) सासवड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी जप्त केलेले दागिने

विशाल घोडके याने दि. १९ व २२ डिसेंबर २०२१ रोजी राजभी ज्वेलर्समधून कानातील २ टाॅप्स आणि २ अंगठ्या असा ४० हजारांचा ऐवज खरेदी करून त्यासाठी गुगल पे आणि फोन पेवरून पैसे जमा केल्याचे खोटे मेसेज दाखवून दागिने घेऊन निघून गेला. ओसवाल यांनी बँक खाते चेक केले असता पैसे जमा नसल्याचे व फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सासवड पोलिसांनी तपास करून या आरोपीला येरवडा, लोहगाव येथून ताब्यात घेतले.

यावेळी आरोपीने फसवणूक केल्याची कबुली देत ऐवज परत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील चिखले, पोलिस हवालदार अभिजित कांबळे, दत्ता तांबे, पोलिस नाईक गणेश पोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. घोडकेने याप्रकारे यापूर्वी फसवणूक केली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT