गुंड निलेश घायवळ  Pudhari
पुणे

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळची लंडनवारी संपणार; प्रत्यार्पण प्रक्रियेबाबत पुणे पोलिसांनी दिली अपडेट

कोथरूड गोळीबार प्रकरणातील फरार गुंड लंडनमध्ये असल्याची हायकमिशनकडून पुष्टी; पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोथरूड गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी गुंड नीलेश घायवळच्या लंडनमधील वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारतातील ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे समोर आले आहे. घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती यूके हायकमिशनकडून पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. (Latest Pune News)

नीलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि अन्य साथीदारांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नीलेश घायवळ याने 'गायवळ' या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते. त्याच्यावर खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत.

तसेच, त्याने चुकीच्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविला असून, त्याला देशात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी भारतातील यूके हायकमिशनला पत्रव्यवहार केला होता. त्यामध्ये घायवळबाबत माहिती मागविण्यात आली होती. पोलिसांच्या या पत्राला आता यूके हायकमिशनने ई-मेलद्वारे उत्तर दिले आहे. त्यानुसार घायवळ हा यूकेमध्येच असून, तो व्हिजीटर व्हिसावर आल्याचे त्यांनी कळविले आहे. घायवळचा व्हिसा फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध आहे. मात्र, त्याआधीच त्याला देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

याबाबत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, 'नीलेश घायवळ हा लंडनमध्ये असल्याचे हायकमिशनकडून अधिकृतपणे कळविण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्याला देशात आणण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT