Mulshi Gas Cylinder Pudhari
पुणे

Mulshi Gas Cylinder: मुळशीत गॅस सिलिंडर टंचाई; एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

ऑनलाइन बुकिंग करूनही सिलिंडर मिळेना; वाढत्या मागणीमुळे ३० दिवस प्रतीक्षेची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पौड : ऑनलाइन किंवा फोनवरून बुकिंग करूनही घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याने मुळशी तालुक्यात विविध गॅसवितरकांच्या दुकानांसमोर नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे.

युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता घरगुती गॅसपुरवठ्यावरही जाणवू लागला आहे. एलपीजीच्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने उद्योग आणि हॉटेल क्षेत्रातील गॅस सिलिंडरच्या वापरावर मर्यादा आणून घरगुती ग््रााहकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अचानक वाढलेल्या मागणीमुळे मुळशी तालुक्यातील विविध गॅसवितरण केंद्रांसमोर बुधवारी (दि. 11) व गुरुवारी (दि. 12) नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी ग््रााहक आणि वितरक यांच्यात शाब्दिक वाद झाल्याच्या घटनाही घडल्या.

वितरकांकडून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी भीतीपोटी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग केल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. ऑनलाइन किंवा फोनवरून बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभम आणि नाराजी व्यक्त होत आहे. सध्याच्या उपलब्ध साठ्यानुसार बुकिंग केल्यानंतर सिलिंडर मिळण्यासाठी किमान 30 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी माहिती वितरकांकडून देण्यात आली.

तहसीलदारांकडून तपासणी

गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच नागरिकांना वेळेवर सिलिंडर उपलब्ध व्हावा, यासाठी मुळशी तहसील कार्यालय व पुरवठा विभाग सतर्क झाला आहे. बुधवारी मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी तालुक्यातील काही गॅस एजन्सी, गोदामे आणि वितरण केंद्रांची पाहणी केली. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा या वेळी त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT