पुणे : शहरात डेंग्यूचे प्रमाण ऑगस्ट महिन्यापासून वाढताना दिसत आहे. वर्षभरातील डेंग्यूच्या रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत. ऑगस्टमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे डासांसाठी आदर्श प्रजनन हंगाम निर्माण झाला. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरात चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. पुण्यात डेंग्यूच्या 86 रुग्णांपैकी 47 रुग्ण ऑगस्टमध्ये नोंदवले गेले आहेत.
सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 73 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. डासोत्पत्ती स्थाने आढळून आलेल्या 1798 आस्थापनांना वर्षभरात नोटिसा पाठवून 2 लाख 5 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी 522 जणांना ऑगस्टमध्ये आणि 79 जणांना सप्टेंबरमध्ये नोटीस पाठवण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारीपासून एकूण 86 पॉझिटिव्ह डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 47 पॉझिटिव्ह डेंग्यू रुग्णांची ऑगस्टमध्ये नोंद झाली आहे. संशयित डेंग्यूच्या संशयित 1282 प्रकरणांपैकी 512 संशयित ऑगस्टमध्ये नोंदवले गेले आहेत. 10 चिकुन गुनिया प्रकरणांपैकी 7 ऑगस्टमध्ये नोंदवले गेले आहेत.
हेही वाचा