नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा: किरकोळ बाजारात साखरेपाठोपाठ गूळही महागला आहे. 55 रुपयांवरून आता 60 रुपये किलो म्हणजेच किलोमागे पाच रुपयांची दरवाढ झाली आहे. आता गणेशोत्सवात आणखी दोन ते तीन रुपयांनी गूळ महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑगस्टमध्ये मुंबई 'एपीएमसी'त गूळ 41 ते 47 रुपये किलो होता. आज 46 तो 51 रुपये झाला आहे. कराड, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांतून गुळाची आवक मुंबई 'एपीएमसी'त होते. सध्या उत्पादन कमी असून, दिवाळीनंतर नवीन उत्पादन बाजारात येईल.
नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात मसूरडाळीची साठेबाजी होत असल्याचे आढळल्यानंतर केंद्र सरकारने तत्काळ प्रभावाने मसूरडाळ साठ्याची माहिती सरकारी पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश बुधवारी दिले. केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयाने मसूरडाळीच्या साठ्याची माहिती देण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या. त्यानुसार व्यापार्यांना मसूरडाळीच्या साठ्याचा तपशील शासकीय संकेतस्थळावर देणे बंधनकारक केले आहे.