Pomegranate Pudhari
पुणे

Pune Fruit Market Prices: पुणे फळबाजारात मोसंबी-डाळिंब स्वस्त; मागणी घटल्याने दरात १० ते २० टक्क्यांची घसरण

मॉन्सूनमुळे दर्जेदार फळांची आवक वाढली; पपई मात्र महागली, कलिंगड-खरबूजाच्या मागणीत मोठी घट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मॉन्सूनच्या हजेरीनंतर राज्यातील मोसंबी आणि डाळिंबाचा हंगाम बहरू लागला आहे. पुणे विभागातून डाळींब तर छत्रपती संभाजीनगर येथून आंबेबहरातील मोसंबीची आवक सुरू आहे. पावसामुळे दर्जेदार फळे बाजारात दाखल होत आहे.

त्यातुलनेत मागणी कमी असल्याने डाळिंबासह मोसंबीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. याउलट आवक घटून मागणी वाढल्याने पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा येत असल्याने कलिंगड, खरबूज आदी थंडगार फळांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याखेरीज, बाजारात दर्जेदार लिंबे दाखल होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, त्यांना अपेक्षित मागणी नाही.

बाजारात दाखल होत असलेल्या बहुतांश फळांची आवक जावक कायम असल्याने त्यांचे गत आठवड्यातील दर टिकून असल्याचे सांगण्यात आले. फळबाजारात रविवारी (दि. १९) लिंबू ६०० ते ८०० गोणी, मोसंबी २५ ते ३० टन, संत्रा १ टन, डाळींब ४० ते ४४ टन, पपई २० ते ३५ टेम्पो, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू १०० गोणी, पेरु ३०० ते ४०० क्रेट, पिअर ५०० ते ६०० क्रेटस्, नासपती दीड ते दोन हजार पेटी, सिताफळ ६ टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते ७००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३०० (४ डझन) : ५०-१३०, संत्रा : (१० किलो) : ३००-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-१८०, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-३०, कलिंगड : १०-१२, खरबूज : १५-२५, पपई : २०-३५, चिक्कू (दहा किलो) : २००-६००, पेरु (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन) : १००-६००, सिताफळ (१ किलो) : २०-१४०, नासपती (१६ ते १७ किलो) : १०००-१२००, पिअर (१० किलो) : १८००-२२००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT