मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा अंदाज Pudhari
पुणे

Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा अंदाज; बंगालच्या उपसागरात वाढली वादळाची तीव्रता

अरबी समुद्राजवळ कमी दाबाचा पट्टा; महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले ते अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात 30ऑक्टोबर पर्यन्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. (Latest Pune News)

बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ सुरुवातीला उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल आणि त्याचा परिणाम भारताच्या अनेक राज्यांवर दिसून येईल.आसा अंदाज आहे.

हे वादळ गेत ६ तासांत १५ किमी प्रतितास वेगाने वायव्येकडे सरकले भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता पश्चिममध्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय, ६५० किमी अंतरावर केंद्रित होते. विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) च्या नैऋत्य-आग्नेय, गोपालपूर (ओडिशा) च्या ७९० किमी दक्षिणेस आणि पोर्ट ब्लेअर (अंदमान आणि निकोबार बेटे) च्या ८१० किमी पश्चिमेस ते सध्या आहे. पुढील १२ तासांत ते नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरून वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ उद्या मंगळवारी २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत महा-चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. उत्तर-वायव्येकडे पुढे सरकत राहिल्याने, २८ ऑक्टोबर रोजी रात्री काकीनाडा येथे मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये ९०ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रतितास या वेगाने प्रवास करेल.

किनारपट्टी भागात पाऊस जास्त...

देशाच्या सर्वच किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि २८ तारखेला काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस ( 200 मी मी) पडण्याची शक्यता आहे. २९ ऑक्टोबर रोजी उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेशात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेलंगणा: २७ आणि २९ रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीचीवर पाऊस पडेल मात्र

राज्यात जमिनीकडे हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 रोजी हे वादळ समुद्रातच शांत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT