

सुभाष किवडे
पुणे : दिवाळी संपल्यामुळे मार्केट यार्डातील गूळ-भुसारच्या घाऊक बाजारातील उलाढाल मंदावली आहे. तुरळक प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. परिणामी, तुरडाळ वगळता सर्व जिनसांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरवर्षी भुसार बाजारात दिवाळीनतर मंदी असते. तीच परिस्थिती यंदा आहे. या आठवड्यातही ग्राहक कमीच असण्याचा अंदाज आहे. (Latest Pune News)
येथील बाजारात तुरडाळीची आवक नेहमीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे तुरडाळीच्या भावात क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित डाळींचे भाव जैसे थे आहेत. दिवाळीनंतर साखर, गुळाची मागणी घटली आहे. त्यामुळे दोन्ही पदार्थांचे भाव स्थिर आहेत. खाद्यतेलांचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत आहे. त्यातच देशात झालेल्या पावसामुळे तेलबियांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागणी कमी झाली असली, तरीही खाद्यतेलांचे भाव टिकून आहेत. अन्नधान्यासह विविध पदार्थांचे भाव स्थिर आहेत. दिवाळीची खरेदी संपल्यामुळे बेसन, गोटा खोबरे, मिरची, आटा, रवा आणि मैदा या सर्व जिनसांची मागणी आता थंडावली आहे.
येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) 4150-4200, पिठी साखर 4350-4400 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2350-2450, रिफाइंड तेल 2150-2750, सरकी तेल 2050-2400, सोयाबीन तेल 1930-2150, पामतेल 1900-2100, सूर्यफूल रिफाइंड तेल 2075-2250, खोबरेल तेल 6000 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, (1121)-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 20000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500,
बासमती कणी 4000-4500, (1509)-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4000-4200, लोकवन नं. 2 3600-40020, नं.3 3300-3600, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3800-4400, मिलबर 3100 रु.ज्वारी :- गावरान नं. 1 5500-5800, गावरान नं.2 4800-5000, नं.3 3500-3800, दूरी नं.1 3600-4000, दूरी नं. 2 3200-3500 रु बाजरी:- महिको नं.1 3700-3800, महिको नं.2 3300-3500, गावरान 3500-3600, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ नं. 1 4500-4650, गूळ नं.2 4300-4450 गूळ नं.3 4150-4275, बॉक्स पॅकिंग 4400-5500 रु. डाळी:- तूरडाळ 9000-11000, हरभराडाळ 7100-7200, मूगडाळ 9000-9700, मसूरडाळ 7400-7500, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 10000-10500 रु. कडधान्ये:-हरभरा 6500-6600,
हुलगा 4800-5000 चवळी 7000-10000, मसूर 6900-7000, मूग 9000-9200, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 15000-15000, वाटाणा हिरवा 13000-13500, वाटाणा पांढरा 4100-4200, काबुली चणा 7500-11000 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5500, साबुदाणा नं.2 5000, साबुदाणा नं.3 4800 रु. वरई भगर :-9500-10500, सावा भगर 9000-9500 रु गोटा खोबरे 3200-3400 रु. शेंगदाणा :- जाडा 8500-9500, स्पॅनिश10800, घुंगरु 9500-9800 टीजे 8000 रु. धने :- गावरान 8000-9000, इंदूर 11000-15000 रु.