पुणे

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शुभम बाबू कुसाळकर यास विशेष (पॉक्सो) न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा आणि 3 हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे निकालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी हा मुलीच्या महाविद्यालयामध्ये शिकायला होता.

तो कायम तिचा पाठलाग करायचा. पीडिता महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये जात असताना तिला तरुणाने हाताला धरून ओढले. वॉशरूमला जाताना येऊ का? अशी अश्लील टिप्पणी करीत, कुणाला काही सांगितले तर तुझ्या अंगावर अ‍ॅसिड फेकेन, अशी धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाला अटक करण्यात आली. न्यायालयाने तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सरकारी वकील अनिल कुंभार यांनी काम पाहिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT