MHT CET Pudhari
पुणे

MHT CET 2026 Registration Extended: एमएचटी सीईटी 2026 प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

पीसीएम-पीसीबीसह विविध अभ्यासक्रमांसाठी अर्जाची अंतिम तारीख वाढवली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27साठी इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग््रेाटेड) व ॲग््राीकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम- पीसीबी समूह, बी. डिझाईन, नर्सिंग, वैद्यकीय डीपीएन, पीएचएन, पदवी शिक्षण (बी. एड), पदव्युत्तर शिक्षण (एमएड), पदव्युत्तर शारीरिक शिक्षण (एमपीएड) या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत 17 अभ्यासक्रमाच्या सीईटीला 12 लाख 28 हजार 213 विद्यार्थ्यांनी प्रवेशनोंदणी केली असून, दोन संधी मिळून 16 लाख 58 हजार 979 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएचटी सीईटी पीसीएम समूह व पीसीबी समूह या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेशनोंदणीची अंतिम तारीख 24 फेबुवारी 2026 होती. विलंब शुल्कासह अंतिम मुदतवाढ 25 फेबुवारी ते 27 फेबुवारी 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

बी.एस्सी. नर्सिंग व डीपीएन / पीएचएन (वैद्यकीय) या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची मुदतवाढ 25 फेबुवारी ते 16 मार्च 2026 पर्यंत करण्यात येत आहे. बी. डिझाईन या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेशनोंदणीची अंतिम मुदतवाढ 25 फेबुवारी ते 27 फेबुवारी 2026 पर्यंत करण्यात येत आहे, तर बी.एड्‌‍., एम.एड्‌‍ व एमपी.एड्‌‍. या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची मुदतवाढ 25 फेबुवारी ते 27 फेबुवारी 2026 पर्यंत करण्यात येत आहे.

प्रवेशनोंदणीमध्ये पीसीएम समूहाची नोंदणी मागील वर्षापेक्षा जास्त झाली असून, 2025च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेमध्ये 4 लाख 64 हजार 263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आजपर्यंत ही नोंदणी 4 लाख 66 हजार 779 झाली असून, ही वाढ 2 हजार 517 ने जास्त आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या ुुु. ारहरलशीं.ेीस या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील. उमेदवारांनी अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT