MHT CET Pudhari
पुणे

MHT CET 2026: एमएचटी सीईटीसाठी तब्बल 11.42 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; अर्ज दुरुस्तीसाठी 5 ते 7 मार्चपर्यंत संधी

पीसीएम-पीसीबी गटाच्या परीक्षांसाठी दोन संधी; विद्यार्थ्यांना लॉगिनमधून नाव, फोटो, जन्मतारीखसह तपशील बदलण्याची सुविधा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग््रेाटेड) व ॲग््राीकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम समूह व पीसीबी समूह प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध केल्या आहेत. या दोन्ही संधी मिळून 11 लाख 42 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2026 च्या एमएचटी सीईटी पीसीएम समूह व पीसीबी समूह प्रवेश नोंदणीला दिनांक 10 जानेवारी 2026 पासून सुरुवात झाली होती व नोंदणीची अंतिम तारीख दिनांक 12 फेबुवारी होती. याला दिनांक 20 फेबुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच दुसरी व अंतिम मुदतवाढ दिनांक 24 फेबुवारीपर्यंत करण्यात आली होती. यानंतर विलंब शुल्कासह दिनांक 25 ते 27 फेबुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

पीसीएम व पीसीबी समूहाच्या या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केलेली आहे. त्यांपैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्तीची सुविधा दिनांक 5 मार्च ते 7 मार्च 2026 दरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग, पीसीएम किंवा पीसीबी समूह समाविष्ट करणे, दुसरी संधी समाविष्ट करणे यामध्ये बदल करण्याची सुविधा आहे. एमएचटी सीईटी पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा 11 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान घेतली जाणार आहे, तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा 14 मे 2026 ते 17 मे 2026 दरम्यान होणार आहे. एमएचटी सीईटी (पीसीबी समूह ) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा 21 एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान घेतली जाणार आहे, तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा 10 मे 2026 ते 11 मे 2026 दरम्यान होणार आहे. ही सीईटी परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.

पीसीएम समूहाच्या नोंदणीमध्ये 10 हजारांनी वाढ

प्रवेश नोंदणीमध्ये पीसीएम समूहाची नोंदणी मागील वर्षापेक्षा जास्त झाली असून, 2025 च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह ) या प्रवेश परीक्षेमध्ये 4 लाख 64 हजार 262 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी ही नोंदणी पहिल्या संधीसाठी 4 लाख 74 हजार 656 झाली असून, ही वाढ 10 हजार 394 ने जास्त आहे.

सात अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या नोंदणीस मुदतवाढ

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ( बी.एचएमसीटी ), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए ), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम ), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग््रेाटेड) / एमसीए (इंटिग््रेाटेड) या सात अभ्यासक्रमांच्या सीईटीची प्रवेशनोंदणी 4 मार्च 2026 पर्यंत होती. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशनोंदणीस 5 मार्च ते 18 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या सात अभ्यासक्रमांना 56 हजार 723 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. 2025 च्या बी.एचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये 1 हजार 436 व बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटिग््रेाटेड) / एमसीए (इंटिग््रेाटेड) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये 1 लाख 12 हजार 926 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या ुुु. ारहरलशीं. ेीस या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT