Mhada house news  
पुणे

Mhada house news : म्हाडाच्या पाच हजार घरांची सोडत

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे पिंपरी चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4935 घरांची सोडत म्हाडाने काढली असल्याची माहिती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले. (Mhada house news)

म्हाडाच्या योजनेतील 2863 सदनिका व वीस टक्के सर्व समावेश गृहनिर्माण योजने अंतर्गत उपलब्ध होणार्‍या 2102 सदनिका असे एकूण 4965 सदनिकांची संगणकीय सोडतीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज बंटी पाटील, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव आदी उपस्थित राहणार आहेत. पुढील आठवड्यात ही सोडत होणार असल्याचे माने यांनी सांगितले.

वीस टक्के सर्व समावेश गृृहनिर्माण योजनेतील पुणे महानगरपालिकेमध्ये 575 घरांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका 1527 सदनिका उपलब्ध असणार आहेत. वीस टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेत एकूण 2102 सदनिका आहेत. तर म्हाडा गृहनिर्माण योजने अंतर्गत प्रथम येणार्‍या प्रथम प्राधान्य योजनेतील 2863 सदनिका आहेत. एकूण 4965 सदनिका आहेत. गेल्या काही वर्षातील पुणे विभागाच्या म्हाडाची ही अकरावी सोडत आहे. ही सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. इच्छुकांना घरांसाठी अर्जभरता येणार आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर एक महिन्याच्या मुदतीत अर्ज भरता येईल, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT