पुणे: महात्मा गांधी राष्ट्रीय ग््राामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) अंतर्गत राज्यात फळबाग लागवड कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग््राामीण भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यास मनरेगाची मोठी मदत होत आहे. त्यादृष्टिने आर्थिक वर्ष 2026-27 करिता राज्यात मनरेगातून एकूण 50 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक अंकुश माने यांनी दिली.
योजनेचा मुख्य उद्देश फळबाग लागवडीच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायात वाढ करणे, उत्पादनक्षमता वाढविणे तसेच ग््राामीण भागात रोजगार निर्मितीस चालना देणे हा आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध फळपिके, फुलपिके, मसाला पिके तसेच औषधी वनस्पती लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. मनरेगा योजनेअंतर्गत गतवर्ष 2025-26 मध्ये राज्यात सुमारे 47 हजार 274 हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिके, फुलपिके व मसाला पिकांची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक असून जॉबकार्डधारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त जाती, दारिद्य रेषेखालील कुटुंबे, महिला प्रमुख कुटुंबे, दिव्यांग व्यक्तींची कुटुंबे, प्रधानमंत्री आवास योजना ग््राामीणचे लाभार्थी तसेच वनहक्क कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.
लाभार्थ्यांना पाच गुंठ्यापासून ते ते दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेत फळबाग लागवड करता येते. यामध्ये आंबा, काजू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, नारळ, केळी, द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, अव्हॅकेडो, सुपारी, बांबू, मोगरा, गुलाब आदी पिकांचा समावेश केला आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मनरेगा योजनेत कोणत्या फळ, फुले व मसाला पिकांचा समावेश
मनरेगा योजनेत प्रामुख्याने आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ (बाणवली/ टी.डी), बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर कलमे, द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, ॲव्हॅकेडो, केळी (3 वर्षे), सुपारी, साग, गिरीपुष्प, कडुलिंब, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कडीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पतीचा समावेश आहे. तर फूल पिकांमध्ये प्रामुख्याने गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा आणि मसाला पिकांमध्ये लवंग, दालचिनी, जायफळ, मिरीचा समावेश आहे.