पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए-एमएमएस ) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीचा सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 8 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले असून, राज्यातील 6. तर परराज्यांतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सीईटी परीक्षेत पाच सत्रांत मिळून 1 लाख 16 हजार 196 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सीईटीमध्ये एकूण 8 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. राज्यातील नाशिक येथील साहिल बाळासाहेब गाजरे, नागपूर येथील पार्थ सतीश मालसरिया, नमन अग््रावाल व यशोधराराजे राठोड, मुंबई येथील शशांक चंद्रहास प्रभू, अमरावती येथील शुभांगी संदीप ठाकूर या सहा विद्यार्थ्यांनी; तर गाजियाबाद, उत्तर प्रदेश येथील आशय प्रधान व डेहराडून, उत्तराखंड येथील रुद्र कैनतुरा या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये 100 पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.
पर्सेंटाईल व टक्केवारीमधील फरक
सीईटीचा निकाल हा पर्सेंटाईलमध्ये जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांनी सीईटीचा निकाल पाहताना टक्केवारी न पाहता पर्सेंटाईल पाहावे. टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज हे तुम्हाला 100 पैकी मिळालेला एक निश्चित भाग किंवा गुण दर्शविते. तर पर्सेंटाईल हे इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमचे रँकिंग म्हणजेच तुम्ही स्पर्धेत कुठे आहात, हे दर्शविते. पर्सेंटाईल हे अत्यंत अचूक आणि योग्य पद्धतीनेच कॅल्क्युलेट केलेले असतात.
प्रवर्गनिहाय सर्वोच्च पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी
खुला प्रवर्ग: पर्सेंटाईल
1. पार्थ सतीश मालसरिया, नागपूर: 100
2. नमन अग््रावाल, नागपूर: 100
3. शशांक चंद्रहास प्रभू , मुंबई शहर: 100
4. शुभांगी संदीप ठाकूर, अमरावती: 100
एससी प्रवर्ग पर्सेंटाईल
1. मयूर कुशाब उराडे, चंद्रपूर: 99.98
एसटी प्रवर्ग पर्सेंटाईल
1. दर्शन राजेश धानजकर, परभणी: 99.73
ओबीसी प्रवर्ग पर्सेंटाईल
1. साहिल बाळासाहेब गाजरे, नाशिक: 100
एसबीसी प्रवर्ग पर्सेंटाईल
1. अनुजा अविनाश भागवत, सातारा: 99.96
एसईबीसी प्रवर्ग पर्सेंटाईल
1. नितेश नवनाथ कदम, सातारा: 99.90
डीटी/ व्हीजे प्रवर्ग पर्सेंटाईल
1. सिद्धांत प्रदीपसिंग परदेशी, अमरावती: 99.99
एनटी 1 बी प्रवर्ग पर्सेंटाईल
1. नितीन रवींद्र मोरे, जळगाव: 99.90
एनटी 2 सी प्रवर्ग पर्सेंटाईल
1. वेदांत बबुवान सोनटक्के, लातूर: 99.91
एनटी 3 डी प्रवर्ग पर्सेंटाईल
1. आदित्य दिलीप काकड, नाशिक: 99.91