Mahavitaran WhatsApp Service Pudhari
पुणे

Mahavitaran WhatsApp Service: महावितरणची व्हॉट्सॲप सेवा सुरू; वीजबिल व तक्रारी आता एकाच क्लिकवर

पुणे परिमंडलातील 39 लाख ग्राहकांना सुविधा; बिल पाहणे, भरणे व तक्रार नोंदणी शक्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिवसेंदिवस महावितरण स्मार्ट होत चालले आहे. ग््रााहक दैनंदिन जीवनात जे माध्यम वापरतात त्याच व्हॉट्‌‍सॲपवर आता महावितरणच्या सेवा अधिकृतपणे पोहोचल्यात. अगदी वीजबिल पाहण्यापासून वीजबिल भरण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी ग््रााहकाला उपलब्ध झाले आहे. वीजग््रााहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

राज्यात महावितरणचे 3 कोटी 12 लाखांहून अधिक वीजग््रााहक आहेत. तर, पुणे परिमंडलात 39 लाख ग्राहक आहे. या सर्व ग््रााहकांना 13 मार्चपासून महावितरणच्या व्हॉट्‌‍सॲप सेवेचा लाभ मिळत आहे.

पूर्वी दरमहा येणारे वीजबिल व ते भरल्याची पावती जतन केली जात असे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महावितरण कंपनीने मोबाईल ॲप, संकेतस्थळावर विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध केल्याने लाखो ग््रााहक अशा सेवांचा लाभ घेत आहेत.

व्हॉट्‌‍सॲपवर उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा

  • वीजबिल आणि पेमेंट

  • ई-बिल आणि पावती

  • तक्रारनोंदणी

  • नवीन जोडणी अर्जाचा मागोवा

  • गो-ग््राीन सुविधा

  • चॅटबॉट सपोर्ट

  • ‌‘ब्ल्यू टिक‌’ असल्याची खात्री करा

वसुली करतेवेळी वीजबिल मिळाले नाही, मिळाल्यावर भरतो, अशा सबबी ग््रााहक द्यायचे. मात्र, आता ग््रााहकाला हवी असणारी वीजबिलाची माहिती महावितरणने आता व्हॉट्‌‍सॲपवर उपलब्ध केली आहे. ग््रााहकांनी आता पेपरलेसकडे वाटचाल करावी. छापील वीजबिलाऐवजी डिजिटल सेवांवर भर द्यावा.
सुनील काकडे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT