Bharat Mandapam Pune Project: पुण्यात ‘भारत मंडपम’ प्रकल्प मंजूर; लोहगाव आरक्षण बदलावर राजकीय संघर्ष

48 एकर जागेवरील आरक्षण बदलास विरोध; 143 विरुद्ध 18 मतांनी प्रस्तावाला मंजुरी
Pune Bharat Mandapam
Bharat MandapamPudhari
Published on
Updated on

पुणे: लोहगाव विमानतळालगतच्या 48 एकर जागेवरील नागरीहिताची विविध आरक्षणे वगळून ‌‘भारत मंडपम‌’ या सांस्कृतिक केंद्राचे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव सोमवारी मुख्य सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. परंतु, काँग््रेाससह शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाने ‌‘भारत मंडपम‌’ची जागा बदलावी, अशी मागणी करीत या प्रस्तावाला विरोध केला, तर भाजप व राष्ट्रवादी काँग््रेासने या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यामुळे 18 विरुद्ध 143 अशा बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला.

Pune Bharat Mandapam
Indapur District Study Centre: मदनवाडीला अभ्यासिका व सांस्कृतिक सभागृहासाठी निधीचे आश्वासन

दिल्लीतील ‌‘भारत मंडपम‌’ या संकुलाच्या धर्तीवर पुण्यातही ‌‘भारत मंडपम‌’ उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने महापालिकेकडे पाठविला आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने लोहगाव सर्व्हे नंबर 236,238 येथील 48 एकरावरील रुग्णालये, वाहनतळ, मंडई, रस्ते अशी आरक्षणे बदलून त्यावर ‌‘भारत मंडपम‌’चे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान कॉंग््रेाससह दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेनेच्या (उबाठा) नगरसेवकांनी ‌‘भारत मंडपम‌’ला आमचा विरोध नाही. मात्र, लोहगाव परिसरात नागरीहिताची आरक्षणे वगळून हे आरक्षण टाकणे चुकीचे होईल, अशी भूमिका घेतली.

Pune Bharat Mandapam
Baramati Crime: बारामतीत अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

त्यामुळे समाविष्ट गावांमध्ये अन्य जागांवर हे आरक्षण टाकावे, अशी मागणी या नगरसेवकांनी केली. नगरसेवक प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, नंदिनी धेंडे, सुहास टिंगरे, अविनाश साळवे, दत्तात्रय धनकवडे, अमोल बालवडकर, रवी टिंगरे, विशाल मलके यांनी या चर्चेत भाग घेत आरक्षण न वगळता अन्य ठिकाणी ‌‘भारत मंडपम‌’ व्हावे, अशी मागणी केली. कॉंग््रेासचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या जागेवरील एका बिल्डरची जागा या आरक्षणातून वगळण्यात आल्याचा आरोप करीत सामान्य नागरिकांच्या हिताचे आरक्षण रद्द केले जाते आणि बिल्डरला अभय दिले जाते, असा आरोप केला. तर शहराची मान उंचाविणारा हा प्रकल्प असल्याचे सांगत भाजप नगरसेवकांनी पाठराखण केली. भाजपकडून धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, पुनीत जोशी, सुरेंद्र पठारे, डॉ. श्रेयस खांदवे, अनिल सातव, अनिल टिंगरे यांनी या ‌‘भारत मंडपम‌’ आरक्षणाचे स्वागत केले.

Pune Bharat Mandapam
Pune Jilha Parishad Members Selection: पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य निवडीकडे लक्ष; राजकीय समीकरणांवर परिणामाची शक्यता

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते चंदू कदम म्हणाले, नागरिकांच्या हिताची आरक्षणे वगळून हा प्रकल्प राबविणे चुकीचे आहे. एवढ्या घाईने कोणाच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव आणला जात आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करून दुसरी पर्यायी जागा निवडावी, अशी मागणी केली, तर मुलभूत सोयीसुविधांवर गदा आणणारा हा प्रस्ताव असल्याने शिवसेना ठाकरे पक्षाचे गटनेते नितीन गावडे यांनी विरोध दर्शविला. विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी ‌‘भारत मंडपम‌’ला विरोध नसल्याचे स्पष्ट करीत विमानतळ परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे दुसरीकडे या आरक्षणाचा विचार करावा, अशी मागणी केली. दरम्यान, ही आरक्षणे अन्यत्र टाकण्याची राष्ट्रवादीने दिलेली उपसूचना मागे घेतली. तर, काँग््रेासने ‌‘भारत मंडपम‌’चे अन्य दुसऱ्या जागेवर आरक्षण टाकण्याची उपसूचना दिली. त्यावर मतदान झाल्याने बहुमताने ती फेटाळण्यात आली. त्यामुळे मुख्य प्रस्तावावरील मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग््रेासने भाजपला साथ दिली. त्यामुळे 143 विरुद्ध 18 अशा बहुमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Pune Bharat Mandapam
Cooperative Banks CSR India: सहकारी बँकांसाठी ‘सीएसआर’ संकल्पना लागू करण्याची मागणी

एक इंचही आरक्षण कमी होणार नाही: बिडकर

‌‘भारत मंडपम‌’ या आरक्षणाचे समर्थन करताना सभागृहनेते गणेश बिडकर म्हणाले, पुणे शहराच्या नावलौकिकात भर टाकणारा हा प्रकल्प असेल. 30 हजार नागरिकांची व्यवस्था होईल अशा पद्धतीचे सभागृह त्यामध्ये असेल. त्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शने, मोठ्या राजकीय सभा, मोठ्या गायकांचे कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतील. या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था यानिमित्ताने निर्माण होईल. विमानतळ भागातील रस्ते मोठे होणार आहेत. मेट्रोही विमानतळापर्यंत होणार आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न होणार नाही. तसेच या ठिकाणी असलेली सर्व आरक्षणे याच भागात अन्यत्र टाकण्यात येतील. विकास आराखड्यातील एक इंचही आरक्षण कमी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे सांगत विरोधाला विरोध करू नये, असे आवाहन बिडकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news