बारामती: महावितरणने वीजबिल थकबाकी अधिक गतिमान केली आहे. बारामती परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 5 लक्ष 22 हजार ग््रााहकांकडे 106 कोटी 22 लक्ष रुपये वीजबिलाची थकबाकी आहे. परिमंडलात चालू डिसेंबर महिन्यात 10 हजार 378 थकबाकीदार ग््रााहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग््रााहकांनी चालू व थकीत वीजबिले भरून वीजपुरवठा खंडितची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन या परिमंडलाकडून करण्यात आले आहे.
वीजबिलांच्या थकबाकीत बारामती मंडलात 1 लाख 18 हजार ग््रााहकांकडे 27 कोटी 65 लाख रुपये, सातारा मंडलात 1 लाख 77 हजार ग््रााहकांकडे 23 कोटी 80 लाख रुपये, तर सोलापूर मंडलात 2 लाख 27 हजार ग््रााहकांकडे 54 कोटी 76 लाख रुपये थकीत आहेत. वीजबिल थकबाकीपोटी बारामती मंडलातील 2702, सातारा मंडलातील 778, तर सोलापूर मंडलातील 5490 ग््रााहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.
विभागनिहाय वीजबिलांची थकबाकी आकडेवारी पुढीलप्रमाणे : बारामती मंडलातील बारामती विभागात 42 हजार 973 ग््रााहकांकडे 8 कोटी 52 लाख रुपये, केडगाव विभागात 50 हजार 978 ग््रााहकांकडे 14 कोटी 81 लाख रुपये, सासवड विभागात 24 हजार 629 ग््रााहकांकडे 4 कोटी 31 लाख रुपये थकीत आहेत. सातारा मंडलातील कराड विभागात 46 हजार 363 ग््रााहकांकडे 5 कोटी 85 लाख रुपये, फलटण विभागात 36 हजार 351 ग््रााहकांकडे 5 कोटी 45 लाख रुपये, सातारा विभागात 42 हजार 996 ग््रााहकांकडे 5 कोटी 28 लाख रुपये, वडूज विभागात 29 हजार 380 ग््रााहकांकडे 4 कोटी 48 लाख रुपये तर वाई विभागात 21 हजार 939 ग््रााहकांकडे 2 कोटी 73 लाख रुपये थकीत आहेत. सोलापूर मंडलातील अकलूज विभागात 20 हजार 267 ग््रााहकांकडे 4 कोटी 47 लाख रुपये, बार्शी विभागात 44 हजार 215 ग््रााहकांकडे 11 कोटी 92 लाख रुपये, पंढरपूर विभागात 39 हजार 950 ग््रााहकांकडे 7 कोटी 89 लाख रुपये, सोलापूर ग््राामीण विभागात 61 हजार 486 ग््रााहकांकडे 16 कोटी 22 लाख रुपये, तर सोलापूर शहर विभागात 61 हजार 760 ग््रााहकांकडे 14 कोटी 24 लाख रुपये थकीत आहेत.
महावितरणने ग््रााहकांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपव्दारे कधीही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने नेटबँकिंग, क्रेडिटेबिट/कॅश कार्ड, मोबाईल वॅलेटव्दारे वीजबिले भरण्याची तसेच तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
थकबाकीदार ग््रााहकाचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला असल्यास पुनर्जोडणी शुल्कापोटी सिंगल फेजकरिता 310 रुपये, थी फेजकरिता 520 रुपये व अधिक जीएसटीसह भरावे लागतात. हे पुनर्जोडणी शुल्कही ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिकचा तपशील वीजबिलावर दिलेला आहे. ग््रााहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तरी ग््रााहकांनी चालू व थकीत वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.