शिवाजी शिंदे
राज्यात महावितरण वीजग््रााहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, गेल्या पाच वर्षांत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आणि इतर ग््रााहकसंख्येत सुमारे 23 लाखांहून अधिक वाढ झाली असून, सध्या ही ग््रााहकसंख्या 3 कोटी 12 लाखांहून अधिक असल्याचे महावितरणच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
पाच वर्षांत ग््रााहकसंख्या साडेआठ टक्क्यांनी वाढली असली, तरी एकूण वीजवापर मात्र 32 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण व इलेक्ट्रिक उपकरणांचा वाढलेला वापर, यामुळे प्रतिमाणसी विजेचा वापर वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई उपनगरांतील काही भागांसह राज्याला वीज पुरविण्याचे काम महावितरण ही शासकीय वीज कंपनी करते. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी अशा अनेक प्रकारच्या ग््रााहकांचा यात समावेश आहे. मागील काही वर्षांत राज्यात औद्योगिकीकरणामुळे ग््राामीण भागातून शहराकडे रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांचा लोंढा जास्त आहे. परिणामी, शहरी भागात राहणाऱ्या घरगुती वीजग््रााहकांची संख्या वाढलेली आहे. सुमारे 75 टक्के वीजग््रााहक हे एकट्या घरगुती प्रकारातील असून, त्यांची 2 कोटी 33 लाख, तर कृषी ग््रााहकांची संख्या 47 लाख 97 हजार आहे.
पाच वर्षांपूर्वी असलेला 1 लाख 9 हजार 513 दशलक्ष युनिटचा वीज वापर 32 टक्क्यांनी वाढून 1 लाख 45 हजार 56 दशलक्ष युनिटवर गेला आहे. यावरून वाढलेला वीज वापर बदलते राहणीमान, विजेवर चालणाऱ्या वाहनांची होणारी वाढ, औद्योगिकीकरण, कृषी पंपाचे ऊर्जीकरण याकडे लक्ष वेधते. त्यामुळे मुंबई वगळून देखील राज्याची विजेची मागणी 24 ते 25 हजार मेगावॅटच्या पुढे जात असल्याचे दिसून येते.
या जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विजेचा वापर होतोय सर्वाधिक
राज्यात मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वीज वापर सर्वाधिक आहे, तर इतर जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात वापर आहे.
या जिल्ह्यांत घरगुती वीजग््रााहक अधिक
राज्यात पुणे, मुंबई (महामुंबई भाग), नागपूर, नाशिक या जिल्ह्यांत घरगुती वीजग््रााहकांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे.