Water Literacy Campaign Pudhari
पुणे

Water Literacy Campaign: राज्यात १२ हजार स्वयंसेवकांच्या सहकार्याने जलसाक्षरतेचा प्रवास!

यशदा पुणेचा पुढाकार; २०२७ पर्यंत प्रत्येक गावात पाण्याचे ताळेबंद तयार करण्याचे उद्दिष्ट — महसूल विभागाची राज्यव्यापी जलसाक्षरता मोहिम सुरू

पुढारी वृत्तसेवा

  • राज्याच्या महसूल विभागातील (मुंबई वगळळून) 34 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा,352 पंचायत समिती आणि सुमारे 28 हजार ग्रामपंचायतीमध्ये मोहिम राबविण्यात येत आहे.

  • राज्यात 2027 सालापर्यत जलसाक्षरता मोहिम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

  • शासकीय अधिका-यांचाही सहभाग

  • पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनीचा पुढाकार

शिवाजी शिंदे

पुणे: राज्याच्या महसुली विभागात (मुंबई वगळून ) साडेबारा हजार स्वंयसेवक (नागरिक, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह )यांच्या सहकार्याने 34 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा, 352 पंचायत समिती आणि सुमारे 28 हजार ग्रामपंचायतीमध्ये जलसाक्षरता मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेनुसार राज्यातील नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून देणे, पाण्याची बचत कशी करावी, पाण्याचा आधुनिक पध्दतीने वापर कसा करावा याबाबत ‘जलसाक्षरता मोहिम’ राबविण्यात येत असून, या मोहिमेसाठी पुण्यातील ‘यशदा’ ने पुढाकार घेतला आहे. ही मोहिम सन 2027 सालापर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Latest Pune News)

राज्यात दिवसेंदिवस पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. या पाण्याच्या कमतरेतवर उपाय करण्यासाठी जलसाक्षरता निर्माण करने गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यात जलसाक्षरता 2022 पासून प्रशिक्षण सुरू करण्यात आली आहेत. पाण्याचा वाढलेला उपसा, अपव्यय, टाळणे, पिकांना आवश्यक तेवढेच पाणी मिळण्यासाठी सुधारित सिंचन पध्दतीचा वापर करणे, पिकांचा फेरपालट किंव कमी पाण्यावर येणारी पिके घेणे याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्थापन करणे, यामुळे पाण्याचा अनावश्यक वापर टाळून पाण्याची बचत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

याबरोबरच गेल्या काही वर्षापासून समुद्राची पाण्यामध्ये प्रदुषणामुळे जैवविविधता नाश होऊ लागली आहे. ही जैववैविधता वाचविण्याचा प्रयत्न देखील जलसाक्षरता मोहिमेतील प्रशिक्षणामधून करण्यात येणार आहे. नदी जोड, नदी स्वछता , नदीपुर्नभरण, पाण्याचा ताळेबंद करणे, पावसाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने कसा वापर करावा, यासाठी देखील या मोहिमेत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पाण्याचे् अंदाज पत्रक कसे करतात

  • संभाव्य एकूण उपलब्ध पाणी

  • गावाला पिण्यासाठी आणि पिकांसाठी लागणारे एकूण संभाव्य पाणी यांची मांडणी

  • तुटीचा किंवा शिल्लक पाण्याचा योग्य मेळ घालून गावाची जास्तीतजास्त जमीन लागवडीखाली आणणे या संपूर्ण प्रक्रीयेला पाण्याचा ताळेबंद किंवा पाण्याचे अंदाजत्रक असे म्हणतात

संभाव्य एकूण उपलब्ध पाणी कसे काढतात ?

  • गाव शिवारात निसर्गत: उपलब्ध होणारे पाणी म्हणजे पावसामुळे गावशिवारात उपलब्ध होणारे पाणी

  • निरनिराळ्या संस्करणात (पाणलोटच्या माध्यमातून अडवलेले पाणी

  • गावशिवारात बाहेरून घेतलेले पाणी

  • संभाव्य एकूण उपलब्ध पाणी

  • पाणलोटाच्या माध्यमातून अडवलेले पाणी

पाण्याचे अंदाजपत्रक

  • गावाला लागणारे एकूण संभाव्य पाणी व इतर पाणी

  • गावाला पिण्यासाठीे व वापरासाठी लागणारे एकूण पाणी

  • गावशिवारातून वाहून जाणारे पाणी

  • शेतीसाठी (खरीब व रब्बी) लागणारे पाणी

  • उघड्या जमीनीवरचे बाष्पीभवन

  • गावाला लागणारे एकूण संभाव्य पाणी

पाण्याचे अंदाजपत्रक कोण व कसे बनवते

  • गावकरी व गावाशी संबधित विविध खात्याचे शासकीय अधिकारी यांच्या समन्वयाने अंदाजपत्रक बनवले जाते

  • गाव पाण्याचे अंदाजपत्रक ही लोकसहभागी सामुहिक प्रक्रीया आहे.

  • शिवारफेरी गावबैठकांच्या माध्यमातून माहितीची शहानिशा होते व माहिती जोडली जाते

  • ग्रामसंभेच्या मान्यतेनंतर पाण्याचे अंदाजपत्रक अंतिम होते.

पाण्याचे अंदाजत्रक केव्हा करावे

  • एप्रिल शेवट किंवा मे महिन्याचा पहिला आठवडा

  • तसेच ऑक्टोबर महिन्यात पाण्याचा ताळेबंद आवश्यक आहे.

पाण्याच्या ताळेबंदासाठी लागणारी माहिती

  • गावची लोकसंख्या, जनावरे, शेळ्यामेंढ्या तसेच कोंबड्यांची संख्या

  • सार्वजनिक ठिकाणाला लागणारे पाणी

  • गावाची एकूण जमीन

  • पडणारा पाऊस मी.मी.मध्येजमीनीचे उतारे व त्याचे क्षेत्र

  • निरनिराळ्या उतारावरून प्रति हेक्टर वाहून जाणारे पाणी स्ट्रेंज तक्ता

  • पाणलोटाची झालेली कामे ( पाणी धारण क्षमतेनिहाय)

  • खरीब व रब्बी पिकांची माहिती हेक्टरमध्ये

  • मोकळी जमीन व वन जमीन क्षेत्र हेक्टरमध्ये

  • गावशिवारा बाहेरून घेतलेले पाणी

1)पाणी शिल्लक राहत असेल तर ?

  • रब्बीच्या पिकांचे क्षेत्र वाढविता येते

2) पाणी कमी पडत असेल तर काय करावे

  • पिकांना पाणी देण्याची पध्दत बदलून पाणी वाचविण्यास प्राध्यान्य देणे त्यामध्ये रब्बी पिके, वार्षिक पिके, व्दि हंगामी पिके

  • पाणलोट क्षेत्र संस्करण -प्रथम प्राधान्य गावपातळीवर लोकसहभागातून तातडीने करता येतील किंवा सेल्फवर असलेली रोजगार हमीची कामे

  • पीक पध्दती बदलणे

  • गाव शिवारावाहेरून पाणी घेऊन ( नव्याने घेणे किंवा वाढवून घेणे )

  • कायमस्वरूपी उपाययोजना

  • जुन्या पारंपरिक पध्दतीने पाण्याचा अतिरिक्त वापर

  • मोट,नाल्यातील सिंचन (पाटाने पिकांना पाणी देणे)

  • सिंचनाच्या आधुनिक पध्दतीव्दारे 40 टक्के पाण्याची बचत

  • ड्रिप, शेततळे, सिमेंटचा बांध,समतल सलग चर, जाळीचे बंधारे

स्वयसेवक करताहेत स्वंयर्स्फतीने काम (अशी आहे रचना, यामध्ये जिल्हानिहाय स्वयसेवक देण्यात आलेले आहेत.)

  • जलनायक (राज्यस्तरीय )-- 24

  • जलयोध्दा (विभागनिहाय )-- 48

  • जलप्रेमी (जिल्हापातळीवर )--340

  • जलदूत (तालुकापातळीवर )-- 3510

  • जलसेवक ग्रामपंचायतपातळीवर ) ---7575

  • जलकर्मी (जिल्हापातळीवर) ------- 1020

राज्यातील या संस्थामधे सुरू आहे प्रशिक्षण

  • यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (मुख्य विभागीय जलसाक्षरता केंद्र )

  • वाल्मी (छत्रपती संभाजीनगर )

  • डॉ.पंजाबराव़ देशमुख प्रबोधिनी ( अमरावती )

  • वनप्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (चंदपूर )

मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियान या योजनेत पाण्याचा ताळेबंद गावातच तयार झाला पाहिजे. हा देखील एक उद्देश आहे. तसेच राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचा लाभक्षेत्र विकास विभाग याचाही सहभाग या मोहिमेत आहे.

जलसाक्षरता मोहिमेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन तयार झालेले स्वयंसेवक अगदी राज्यपातळीपासून ग्रामपंचायत पातळीपर्यत जाऊन ते पाण्याचे नियोजन कसे करावे, पाण्याचा ताळेबंद आणि अंदाजपत्रक कसे तयार करावे याबाबत गावपातळीवर नागरिकांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे .त्यास यश येऊ लागले आहे.
मल्लीनाथ कलशेट्टी- उपमहासंचालक तथा संचालक ,राज्य ग्रामीण विकास संस्था-यशदा पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT