Government Offices Relocation Pudhari
पुणे

Government Offices Relocation: राज्यातील दस्तनोंदणी कार्यालये शासकीय जागेत स्थलांतरित होणार

खासगी इमारतींमधील कार्यालयांबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांची स्पष्ट सूचना; जिल्हानिहाय सविस्तर आराखडा तयार होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागाची दस्तनोंदणीची कार्यालये खासगी जागेत आहेत ती शासकीय जागेत स्थलांतरित करण्याबाबत जिल्हानिहाय सविस्तर अहवाल तयार करून त्यानुसार आराखडा तयार करावा, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिल्या आहेत.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या संघटनेसमवेत महसूलमंत्री बावनकुळे यांची मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह संबंधित अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने नागरिकांना पारदर्शक व जलद सेवा देण्याचे काम केले जात आहे. या विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे सेवा विषयक व अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांची पदोन्नती, रिक्त पद भरती संदर्भात कार्यवाही गतीने करावी. सेवाप्रवेश नियमाबाबत सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल.

महसूल विभागाच्या धर्तीवर मुद्रांक व नोंदणी विभागातील कर्मचार्‍यांच्या पदनामात बदल करण्याबाबत प्रस्ताव घेण्यात यावा. अधिकारी-कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षण यशदामध्ये देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना नोंदणी विभागातील अधिकारी यांना दिल्या.

मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करावी

एखाद्या दस्ताच्या अनुषंगाने नोंदणी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावयाचा असल्यास याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे याबाबत माहिती घ्यावी. तसेच, एखाद्या दस्ताच्या नोंदीसंदर्भात त्रयस्थ व्यक्तीकडून तक्रार आल्यास या तक्रारीसंदर्भात पडताळणी करण्यासाठी विभागाने मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करावी, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT