पुणे: राज्यात पावसाळ्याचा दिवसात पडलेला जोरदार पावसामुळे यंदा धरणे तुंडुब भरून वाहिली. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान पाऊस पूर्णपणे थांबला आहे. राज्यातील धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असून, 114 धरणामध्ये पाणीसाठा 100 टक्के आहे. तर केवळ पाच धरणांमध्ये शून्य ते 10 टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान राज्यातील धरणामध्ये 91.31 टक्के पाणीसाठा आहे. (Latest Pune News)
राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यादेखील (काही दिवस वगळता ) मोठ्या प्रमाणावर सक्रीय होता. या पावसामुळे धरणे भरून वाहिली. त्यामुळे मध्यमहाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील जवळजवळ सर्वच नद्यांना महापूर आले. विशेषत: मराठवाड्यात महापूरामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. मागील महिन्यांपासून राज्यातील पाऊस पूर्णपणे थांबला आहे. तसेच मान्सूनने देखील देशाचा निरोप घेतला आहे.
राज्यात असलेल्या एकूण 2 हजार 997 मोठे, मध्यम, लघु प्रकल्प आहे. त्यात सध्या 91.35 टक्के पाणीसाठा आहे. 114 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा असून, उर्वरित धरणांमध्येही मुबलक पाणी आहे. दरम्यान केवळ पाच धरणामधील पाणीसाठा हा शून्य ते 10 टक्क्यापर्यत आहे. यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज जलसंपदा विभागातील अधिका-यांनी व्यक्त केला आहे.
शून्य ते 10 टक्केपर्यत पाणीसाठा असलेली धरणे
बीड-- बोरगाव अंजनपूर
नांदेड-- दिमडी, किनवट (मंगरूळ)
पुणे --लोणावळा टाटा
राज्यातील धरणाचा विभागानुसार पाणीसाठा (पाणीसाठा टक्क्यांमध्ये)
विभाग---- सध्याचा साठा---मागील वर्षीचा साठा
नागपूर ----89.69-----85.39
अमरावती --- 91.46----91.78
छत्रपती संभाजीनगर----88.89--- 77.89
नाशिक ---- 88.89----84.57
पुणे ----- 93.68 ---- 91.75
कोकण---- 91.93 --- 94.27
--------------------
एकूण------91.31---- 87.72