Cyber Fraud Pudhari
पुणे

Baramati Maha Discom Cyber Fraud Alert: सायबर फसवणूक वाढली; महावितरणकडून बारामतीतील वीजग्राहकांना सतर्कतेचे आवाहन

बनावट कॉल, SMS, WhatsApp संदेशांपासून सावध रहा; ओटीपी-यूपीआय माहिती कधीही देऊ नका

पुढारी वृत्तसेवा

बारामती: डिजिटल युगात ग््रााहकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे ग््रााहकांना जलद व पारदर्शक सेवा मिळते आहे. परिणामी ग््रााहकांचा वेळ, श्रम व पैसा वाचतो आहे, तर सायबर भामट्यांकडून सायबर फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून महावितरणच्या बारामती परिमंडलाने सर्व ग््रााहकांना सायबर सुरक्षेबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सायबर भामट्यांकडून महावितरणच्या नावाचा वापर करून बनावट फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्‌‍सॲप संदेश किंवा ई-मेलद्वारे ग््रााहकांची वैयक्तिक माहिती, ओटीपी, बँक तपशील किंवा यूपीआय माहिती मागून फसवणूक होऊ शकते. काही वेळा ‌’वीज कनेक्शन तत्काळ तोडले जाईल‌’ अशी धमकी देऊन फसवणूक केली जाऊ शकते. या दृष्टीने महावितरणकडून ग््रााहकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत.

अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या एसएमएस/कॉल/ व्हॉट्‌‍सॲप संदेशांना प्रतिसाद देऊ नका. महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही अथवा कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवत नाही. केवळ VM- MSEDCL / VK- MSEDCL / AM- MSEDCL/ JM- MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते. ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाईल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला ओटीपी शेअर करू नका.

महावितरण कधीही ग््रााहकांकडून फोनवरून ओटीपी ( OTP), यूपीआय ( UPI), पिन, डेबिट/क्रेडिट कार्ड तपशील मागत नाही. ग््रााहकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी फक्त अधिकृत महावितरण ग््रााहक मोबाईल ॲप, वेबसाइट ( www.mahadiscom.in ) किंवा अधिकृत पेमेंट गेटवेचाच वापर करावा. कुठल्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये. सोशल मीडियावरून किंवा व्हॉट्‌‍सॲपवरून आलेल्या बनावट मेसेजेसकडे दुर्लक्ष करावे.

फसवणूक झाल्यास काय करावे?

तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधावा. नजीकच्या सायबर पोलीस ठाण्यात किंवा सायबर गुन्हा हेल्पलाईन 1930 वर किंवा https://cybercrime.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी महावितरण कार्यालयास किंवा महावितरणच्या 24 तास सेवेतील अधिकृत मध्यवर्ती ग््रााहक सुविधा सेवा केंद्राचे टोल फी क्रमांक 1800-233-3435 / 1800-212-3435 किंवा राष्ट्रीय टोल फी क्रमांक 1912 / 19120 वर संपर्क साधावा. महावितरण आपल्या ग््रााहकांच्या माहितीच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देते. ग््रााहकांनी जागरूक राहून, योग्य माहितीच्या आधारेच डिजिटल सेवांचा वापर केल्यास सायबर फसवणूक टाळता येईल, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाने केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT