

वेल्हे: राजगड खोऱ्यातील साखर (ता. राजगड) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत ग््राामपंचायतीकडून भरणा करताना चुकून दिलेली 20 हजार 700 रुपयांची जादा रक्कम बँकेचे रोखपाल अमोल रेणुसे यांनी प्रामाणिकपणे ग््राामपंचायतीला परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बुधवारी (दि. 8) दुपारी 3 वाजता साखर ग््राामपंचायतीचे लेखनिक गणेश यादव हे ग््राामपंचायतीच्या घरपट्टीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी जिल्हा बँकेच्या साखर शाखेत आले होते. त्यांनी 2 लाख 27 हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी चलन भरून रक्कम जमा केली आणि पावती घेऊन निघून गेले.
दरम्यान, रोखपाल अमोल रेणुसे यांनी जमा केलेली रक्कम दोनवेळा मोजली असता ती 2 लाख 47 हजार 700 रुपये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भरणा केलेल्या रकमेपेक्षा 20 हजार 700 रुपये जादा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी ही बाब तत्काळ शाखा व्यवस्थापक विकास कुमठे यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर गुरुवारी (दि. 9) सकाळी साखर ग््राामपंचायतीचे सरपंच शंकर रेणुसे व ग््राामपंचायत अधिकारी पी. एस. यादव यांना बँकेत बोलावून ही जादा रक्कम अधिकृतरीत्या ग््राामपंचायतीकडे परत करण्यात आली.
प्रामाणिकपणे रक्कम परत केल्याबद्दल रोखपाल रेणुसे यांचा ग््राामपंचायत व ग््राामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र रांजणे, समीर मालुसरे, राहुल रसाळ आदी उपस्थित होते.