Lemon Pudhari
पुणे

Pune Lemon Price Drop: उन्हाळ्यातही लिंबाचे दर घसरले; हॉटेल-रेस्टॉरंटची मागणी 40% कमी

बाजारात लिंबू शिल्लक; स्वस्त दरामुळे ग्राहक खूश, शेतकऱ्यांना मात्र फटका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उन्हाळा वाढला की शहरातील रसवंतीगृहे, सरबत विक्रेते यांच्यासह हॉटेल, रेस्टॉरंटकडून लिंबाची मागणी वाढते. यंदा गॅसपुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल तसेच रेस्टॉरंटची लिंबाच्या मागणी तब्बल चाळीस टक्क्यांनी घटली आहे.

परिणामी, यंदा ऐन उन्हाळ्यात लिंबाचे दर गतवर्षीपेक्षा बरेच घटले आहेत. घाऊक बाजारात 15 ते 20 किलोच्या गोणीला 300 ते 1800 रुपये दर मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार दहा रुपयांना एक ते दोन लिंबाची विक्री होत आहे.

उन्हाच्या झळा जाणवू लागताच शहरात रसवंतीगृहे, सरबत विक्रीची दुकाने, हातगाड्या मोठ्या प्रमाणात सुरू होतात. उन्हाने होणारी जीवाची काहिली शमविण्यासाठी नागरिक उसाचा रस, सरबत यांचा आधार घेतात. परिणामी, या काळात लिंबाला मोठी मागणी असते. उन्हाळ्यात होणाऱ्या आवकेच्या तुलनेत यंदाही आवक टिकून आहे.

पुणे विभागासह हैदराबाद येथून दररोज आठशे ते एक हजार गोणी बाजारात दाखल होत आहे. मात्र, रेस्टॉरंट तसेच हॉटेलकडून होणाऱ्या लिंबांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे लिंबाच्या 15 ते 20 किलोच्या गोणीमागे 700 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे.

एरवी एप्रिलमध्ये लिंबांना चांगला दर मिळतो. मात्र, यंदा निच्चांकी भाव मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. किरकोळ बाजारात स्वस्त दरात लिंबू मिळत असल्याने ग््रााहक खूश आहेत. उन्हाळ्यात पहिल्यांदाच मागणीअभावी बाजारात लिंबू शिल्लक राहत आहेत.
रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT