House Registration Pudhari
पुणे

Krisala Developers Record Registration: क्रिसाला डेव्हलपर्सचा विक्रम; एका दिवसात 300 हून अधिक घरांची नोंदणी

डिजिटल गव्हर्नन्सचा प्रभावी वापर; इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: डिजिटल गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करीत क्रिसाला डेव्हलपर्सने एका दिवसात तब्बल 300 हून अधिक घरांची नोंदणी पूर्ण करीत रिअल इस्टेट क्षेत्रात उल्लेखनीय विक्रम नोंदविला आहे. ‌’क्रिसाला ग््राँड रेकॉर्ड रजिस्ट्री‌’ या उपक्रमांतर्गत पार पडलेल्या या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉड्‌‍र्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉड्‌‍र्समध्ये एका दिवसात सर्वाधिक मालमत्ता करार पूर्ण करणारा डेव्हलपर म्हणून करण्यात येत आहे.

या विक्रमाची पडताळणी करण्यासाठी संबंधित संस्थांचे अधिकारीही उपस्थित होते. ही नोंदणी प्रक्रिया पुण्यातील उत्तर हिंजवडी येथील क्रिसाला-हिरानंदानी टाऊनशिपच्या फेज-1 आणि फेज-2 मधील घरांसह कंपनीच्या इतर प्रकल्पांसाठी करण्यात आली.

डिजिटल दस्तऐवजीकरण, सुलभ पडताळणी प्रणाली आणि समन्वित नोंदणी प्रक्रियेच्या मदतीने ही प्रक्रिया पार पडली. या उपक्रमामुळे शेकडो गृहखरेदीदारांना एका दिवसातच मालमत्तानोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता आली.

या उपक्रमासाठी दस्तऐवजांची पूर्वतयारी, डिजिटल पायाभूत सुविधा, ग््रााहकांशी समन्वय तसेच बँकिंग भागीदार आणि सीआरएम टीमचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरला. या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह काही वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर झालेली ही नोंदणी प्रक्रिया पुण्यातील वाढत्या गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

गृहखरेदीदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे शक्य झाले

या विक्रमाबाबत बोलताना क्रिसाला डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अग््रावाल यांनी सांगितले की, गृहखरेदीदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हा टप्पा गाठता आला आहे. फेज-1 ‌’एव्हरलँड‌’ आणि फेज-2 ‌’एव्हरलिन‌’ या प्रकल्पांमध्ये केवळ दोन महिन्यांत सुमारे दोन हजार घरांची विक्री झाली आहे. आजचे ग््रााहक केवळ घर नव्हे, तर संपूर्ण लाइफस्टाईल आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेत गुंतवणूक करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT