Pune Municipal Service Rules: पुणे महापालिकेत सेवा नियम व आरोग्य विभाग भरतीत बदलांना मंजुरी

सेवानिवृत्ती व पदोन्नती प्रश्न मार्गी; आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला नवे स्वरूप
Employment
EmploymentPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या विधी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, तसेच आरोग्य विभागातील भरती व पदोन्नतीसंदर्भातील महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांच्या सेवेसंबंधी निर्माण झालेला प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून, आरोग्य विभागातील पदोन्नती व भरतीप्रक्रियेतही बदल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती विधी समितीच्या अध्यक्षा स्वरदा बापट यांनी दिली.

Employment
Indapur Highway Accident: लोणी देवकर येथे भीषण अपघात; टायर फुटून क्रूझरची ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू

महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांनुसार श्रेणी 4 मधून श्रेणी 3 मध्ये रूपांतरित झालेल्या पदांवर कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या मूळ पदाच्या श्रेणीप्रमाणे करण्यात आली होती. मात्र, नियमांनुसार त्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त झाले होते, तर काही जणांना 60 वर्षांपर्यंत सेवेत राहण्याची संधी द्यावी, अशी मागणी होती.

Employment
India Sugar Export Quota: साखर निर्यात कोट्यावर जाचक अटी; राज्यातील कारखानदार नाराज

या पार्श्वभूमीवर, ज्या कर्मचाऱ्यांनी 58 वर्षांनंतर सेवेत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि जे शारीरिकदृष्ट्‌‍या सक्षम आहेत, त्यांना लेखी अर्जाच्या आधारे पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशा कर्मचाऱ्यांना 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनिवार्यपणे सेवानिवृत्त करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी 60 वर्षांपर्यंत सेवा केली, असे गृहित धरून त्यांच्या वेतनवाढीला काल्पनिक मंजुरी देण्यात येणार असून, त्याआधारे अंतिम मूळ वेतन निश्चित केले जाईल. मात्र, या वेतनवाढीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

Employment
Maharashtra Stamp Duty Refund: मुद्रांक शुल्क परतावा जलद; 20 लाखांपर्यंतची प्रकरणे जिल्हा स्तरावरच निकाली

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उप आरोग्य निरीक्षक आणि प्रमुख आरोग्य निरीक्षक या पदांच्या भरती व पदोन्नती नियमांमध्येही बदल करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सेवा (सेवा व वेतनांचे वर्गीकरण) नियम 2014 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी मुख्य सभेकडे पाठविण्यात येणार आहे.

Employment
Pune Property Tax Abhay Yojana: अभय योजनेला थंड प्रतिसाद; 1070 कोटींची वसुली, तरीही थकबाकीदारांकडून पाठ फिरवली

प्रमुख आरोग्य निरीक्षक (मंडळ अधिकारी) पदासाठी असलेल्या अनुभवाच्या अटींमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या पदासाठी प्रमुख आरोग्य निरीक्षक म्हणून तीन वर्षांचा अनुभव आवश्यक होता. मात्र, सुधारित प्रस्तावानुसार उप आरोग्य निरीक्षक पदावरील किमान तीन वर्षांचा अनुभव ग््रााह्य धरण्यात येणार आहे. तसेच, उप आरोग्य निरीक्षक पदासाठी सध्या असलेले नामनिर्देशन 50 टक्के आणि पदोन्नती 50 टक्के असे प्रमाण बदलून 100 टक्के पदोन्नतीद्वारे भरती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य निरीक्षक पदावर किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक राहणार आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक पदांसाठीही भरतीच्या अटी व प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. या सर्व प्रस्तावांना बैठकीत मंजुरी देऊन पुढील निर्णयासाठी मुख्य सभेकडे पाठविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news