Hadapsar Water Supply Issue: हडपसरमध्ये पाणीटंचाई तीव्र; योजनेच्या विलंबाविरोधात उपोषणाचा इशारा

समान पाणीपुरवठा योजना रखडल्याने नागरिक त्रस्त; 30 मार्चपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेकडून हडपसर परिसरात राबविण्यात आलेल्या समान पाणीपुरवठा योजनेची कामे रखडल्याने नागरिकांना तीव पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. येथील पाण्याच्या टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करावे, योजना कार्यान्वित होईपर्यंत पाणी मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी करत मागण्या पूर्ण न झाल्यास 30 मार्चपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांनी दिला आहे.

Water Crisis
Pune Municipal Service Rules: पुणे महापालिकेत सेवा नियम व आरोग्य विभाग भरतीत बदलांना मंजुरी

महापालिकेने सन 2016 ते 2018 या कालावधीत हडपसर परिसरात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतले होते. मात्र, सात ते आठ वर्षे उलटूनही या योजनांची कामे पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही परिसरात अजूनही कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत असल्याने आर्थिक तसेच मानसिक ताण वाढत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

Water Crisis
Indapur Highway Accident: लोणी देवकर येथे भीषण अपघात; टायर फुटून क्रूझरची ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू

तुकाई टेकडी, हडपसर बस डेपो परिसर तसेच आनंदनगर भागात उभारण्यात आलेल्या विविध जलसाठा प्रकल्पांमधून हडपसर गावठाण, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, लक्ष्मी कॉलनी, आकाशवाणी परिसर, ससाणेनगर तसेच काळे बोराटे- न्हावले नगर या भागांना नियमित पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रात्री उशिरा किंवा मर्यादित वेळेसाठीच पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या संदर्भात गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सुरसे यांनी सांगितले.

Water Crisis
India Sugar Export Quota: साखर निर्यात कोट्यावर जाचक अटी; राज्यातील कारखानदार नाराज

त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या विषयासंदर्भात स्मरणपत्रही दिले आहे. त्यामध्ये प्रलंबित पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात, योजना पूर्ण होईपर्यंत पाणी मीटर बसविण्याची सक्ती करू नये तसेच हडपसर परिसर टँकरमुक्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 30 मार्चपासून गाडीतळ, हडपसर येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असेही सुरसे यांनी स्पष्ट केले.

Water Crisis
Maharashtra Stamp Duty Refund: मुद्रांक शुल्क परतावा जलद; 20 लाखांपर्यंतची प्रकरणे जिल्हा स्तरावरच निकाली

हडपसरमधील प्रलंबित पाणीपुरवठा योजना

  • तुकाई टेकडी (गजानन महाराज मंदिर) - 35 लाख लिटर क्षमता

  • हडपसर बस डेपो (हडपसर गाव) - 45 लाख लिटर क्षमता

  • आनंदनगर (आकाशवाणी) - 35 लाख लिटर क्षमता

  • आनंदनगर (लक्ष्मी कॉलनी -15 नंबर) - 35 लाख लिटर क्षमता

  • आनंदनगर (साधना विद्यालय)- 45 लाख लिटर क्षमता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news