Foreign Nationals Pudhari
पुणे

Pune Expired Visa Foreign Nationals: कोंढव्यात व्हिसाची मुदत संपूनही वास्तव्य; २६ परदेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात

स्थानिक पोलिस व विशेष शाखेची संयुक्त शोधमोहीम; पासपोर्ट, व्हिसा आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: व्हिसाची मुदत संपल्यानंतरही कोंढवा परिसरात अवैधपणे वास्तव्य करणार्‍या २६ परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक पोलिस, विशेष शाखाने संयुक्तपणे कोंढवा परिसरात शोधमोहीम राबवून ही कारवाई केली.

ताब्यात घेतलेल्या नागरिकांमध्ये येमेनसह आखाती देशांतील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे. पोलिसांनी संबंधित परदेशी नागरिकांचे पासपोर्ट, व्हिसा तसेच पुण्यात वास्तव्य करण्यासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली.

यातील काही नागरिक विद्यार्थी व्हिसावर शिक्षणासाठी, तर काही वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल व्हिसावर भारतात आले होते. व्हिसाची निर्धारित मुदत संपल्यानंतरही ते कोंढवा परिसरात राहत असल्याचे तपासात समोर आले.

सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी

पुण्यात आल्यानंतर काही परदेशी नागरिक कुटुंबीयांसह कोंढव्यात वास्तव्यास असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, संयुक्त पथकाने परिसरात तपासणी करून संबंधितांना ताब्यात घेतले. परदेशी नागरिकांच्या मायदेशी परत पाठविण्या बाबत संबंधित दूतावासांशी संपर्क साधण्यात येत आहे.

ताब्यात घेतलेल्या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. याबाबत परिमंडळाचे पोलिस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी संबंधित दूतावासांशी संपर्क साधून परदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT