रवी कोपनर
कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी प्रभागामध्ये (क्र. 40) झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चारही जागांवर दहा हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला. भाजपच्या रंजना टिळेकर, वृषाली कामठे, पूजा कदम आणि अर्चना जगताप या चारही महिला उमेदवारांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांचा पराभव करीत प्रभागातील राजकीय समीकरणे बदलून टाकली.
या निवडणुकीत विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी स्वतः चारही उमेदवारांसोबत आघाडी घेत प्रचाराची सूत्रे हातात ठेवली. विकासकामांचा अजेंडा, बूथस्तरीय नियोजन आणि स्थानिक सामाजिक समीकरणांचा अचूक अंदाज या त्रिसूत्रीमुळे भाजपला मोठे यश मिळाले.
या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रमुख लढत झाली. काँग््रेास, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या पक्षांनीही उमेदवार दिले; मात्र पूर्ण पॅनल नसल्याने त्यांचे आव्हान मर्यादित ठरले. बहुकोनी लढतीत मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला. भाजपने दोन माजी नगरसेविका (रंजना टिळेकर, वृषाली कामठे) आणि दोन नवीन चेहरे (पूजा कदम, अर्चना जगताप) असा संतुलित पॅनल उभा केला. ’चारही महिला उमेदवार’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. महिला मतदारांमध्ये सकारात्मक लाट निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला.
कात्रज परिसरात कदम परिवाराचे असलेले वलय ओळखून पूजा कदम यांना उमेदवारी देणे हा रणनीतिक निर्णय ठरला. तसेच, मनसेचे युवा नेते अमित जगताप यांना भाजपमध्ये सामील करून त्यांच्या पत्नी अर्चना जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. स्थानिक पातळीवरील प्रभावी व्यक्तींचा योग्य वापर हा भाजपच्या विजयाचा महत्त्वाचा घटक ठरला.
प्रभागात कर्जत-करमाळा तालुक्यातील स्थलांतरित नागरिक, विशेषतः धनगर समाजाचे मतदार लक्षणीय आहेत. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग््रेासने वर्षा मारकड यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपने विधान परिषद सभापती राम शिंदे यांची सभा घेत समाजनिहाय समीकरणात प्रभावी हस्तक्षेप केला. राष्ट्रवादी काँग््रेासने ऐनवेळी तगडे उमेदवार आयात केले. गंगाधर बधे, वर्षा मारकड, सपना धर्मावत, तसेच शरद पवार यांच्या पक्षाशी संबंधित बाळासाहेब कवडे यांना उमेदवारी देत जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला. स्नेहल कामठे यांचे पक्षांतर, कल्पना मुळीक यांची बंडखोरी आणि इच्छुक कार्यकर्त्यांचा कमी झालेला सहभाग यामुळे राष्ट्रवादी काँग््रेासची मते विभागली गेली.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने वसंत मोरे यांचे चिरंजीव रूपेश मोरे यांना उमेदवारी देत युवा चेहरा पुढे केला. भष्टाचाराचे आरोप करत निवडणूक तापवण्याचा प्रयत्न झाला; मात्र संघटनात्मक ताकद आणि बूथ व्यवस्थापनाच्या बाबतीत पक्ष कमी पडल्याचे दिसले. शिंदे गटाकडून माजी नगरसेविका संगीता ठोसर यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु त्यांनाही अपेक्षित यश मिळाले नाही.
बंडखोरी रोखत भाजपचा विकासावर भर
आमदार योगेश टिळेकर यांनी भाजपमधील नाराजी आटोक्यात ठेवली. अपवाद वगळता बंडखोरी रोखण्यात ते यशस्वी ठरले. प्रचाराचे केंद्रीकरण ‘विकास’ या मुद्द्यावर करण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा, प्रलंबित प्रकल्प आणि भविष्यातील आराखडे यांचा सातत्याने उल्लेख करण्यात आला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या, असे आ. टिळेकर यांचे आवाहन मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले. निकालानंतर मतदारांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट