Pune Suncity Karvenagar Bridge: सनसिटी–कर्वेनगर पूल एप्रिलअखेर खुला; सिंहगड रोड वाहतुकीला मोठा दिलासा

मुठा नदीवरील 279 मीटर लांबीच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात; वारजे महामार्गावरील कोंडीही कमी होणार
Pune Suncity Karvenagar Bridge
Pune Suncity Karvenagar BridgePudhari
Published on
Updated on

पुणे: सिंहगड रोडवरील वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मुठा नदीवर उभारण्यात येत असलेल्या सनसिटी ते कर्वेनगर जोडणाऱ्या पुलाचे काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर सिंहगड रोड, कोथरूड आणि कर्वेनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून, वारजे महामार्गावरील ताणही लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

Pune Suncity Karvenagar Bridge
Pune Property Sale: जानेवारीत पुण्यात 14,537 मालमत्ता व्यवहार; शासनाला 609 कोटींचा महसूल

सिंहगड रोडवरून कर्वेनगर, कोथरूड, तसेच या भागांतून सातारा रस्ता आणि कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वारजे परिसरातील महामार्गावरील पुलावर सकाळ-संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सनसिटी ते कर्वेनगरदरम्यान मुठा नदीवर नव्या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. मे 2023 मध्ये या कामाचा कार्यादेश दिला आणि सप्टेंबर 2023 पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. गेल्या अडीच वर्षांत काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून, आता अंतिम टप्पा सुरू आहे.

Pune Suncity Karvenagar Bridge
Pune Family Court Women Lawyers: पुणे कुटुंब न्यायालयात महिलांची दमदार उपस्थिती; 450 हून अधिक महिला वकील कार्यरत

कामाची सद्य:स्थिती

कर्वेनगरकडील बाजूस खांब, गर्डर आणि पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सनसिटीकडील सहा खांबांपैकी चार खांब पूर्ण झाले असून, उर्वरित दोन खांबांचे काम सुरू आहे. तसेच, या बाजूस स्पॅन आणि उताराच्या कामाला अजून वेळ लागणार आहे. यानंतर दोन्ही बाजूंना डांबरीकरण, विद्युत दिवे, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, पदपथ यांसारखी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करून एप्रिलअखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी विशेष प्रकल्प विभाग प्रयत्नशील आहे.

Pune Suncity Karvenagar Bridge
Pune crime: पुणे हादरले! रेल्वे स्थानकावरुन 4 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, अत्याचारानंतर पुन्हा स्थानकावर सोडले; विकृतास अटक

पुलाची वैशिष्ट्‌‍ये

  • एकूण लांबी-279 मीटर

  • रुंदी - 30 मीटर

  • पोहोच रस्ता (कर्वेनगर बाजू) - 34 मीटर

  • पोहोच रस्ता (सनसिटी बाजू) -20 मीटर

  • पोहोच रस्त्याची रुंदी- 30 मीटर

  • अस्तित्वातील रस्त्याची रुंदी (सनसिटी बाजू) - 30 मीटर

  • एकूण गाळे - 9

  • एकूण खर्च - 44 कोटी 86 लाख रुपये

पुलामुळे होणारे फायदे

  • सिंहगड रोड, राजाराम पूल आणि कर्वेनगरमधील वाहतुकीचा ताण कमी होणार

  • वारजे महामार्गावरील कोंडी कमी होण्यास मदत

  • सिंहगड रोड ते कोथरूड प्रवासाचा वेळ कमी

  • अपघात आणि कोंडीच्या समस्येत घट

  • विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व रहिवाशांसाठी प्रवास सुलभ

Pune Suncity Karvenagar Bridge
Maharashtra SSC Exam Copy Cases: दहावीच्या पहिल्याच पेपरला 11 कॉपीप्रकरणे; पुणे विभागात सर्वाधिक प्रकार

सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कर्वेनगरकडील काम पूर्ण झाले असून, सनसिटीकडील काम सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.

दिनकर गोजारे, प्रमुख, प्रकल्प विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news