Pune Property Sale: जानेवारीत पुण्यात 14,537 मालमत्ता व्यवहार; शासनाला 609 कोटींचा महसूल

एक कोटींच्या पुढील सदनिकांना वाढती मागणी; मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात 5 टक्के घट
Buildings
BuildingsPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सदनिका आणि मालमत्ताच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी 2026 मध्ये 14 हजार 537 मालमत्तांच्या (सदनिकांसह ) विक्रीचे व्यवहार झाले आहेत. यातून शासनाच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाला सुमारे 609 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या जानेवारी 2025 च्या तुलनेत महसुलात 5 टक्क्यांची घट झाली आहे.

Buildings
Pune Family Court Women Lawyers: पुणे कुटुंब न्यायालयात महिलांची दमदार उपस्थिती; 450 हून अधिक महिला वकील कार्यरत

मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात 17 हजार 449 मालमत्तांची विक्री झाली होती. त्यामधून सुमारे 638 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दरम्यान, शहर आणि उपनगरांत एक कोटीहून अधिक किमतीच्या सदनिकांना मागणी वाढली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

Buildings
Pune crime: पुणे हादरले! रेल्वे स्थानकावरुन 4 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, अत्याचारानंतर पुन्हा स्थानकावर सोडले; विकृतास अटक

पुणे शहर आणि परिसरात मागील काही वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांबरोबरच आसपासच्या भागात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेतनाचे पॅकेजेस कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. त्यामुळे साहजिकच शहराच्या आसपास सदनिका (किंवा मालमत्ता) घेण्याचे प्रमाण वाढले आहेत. शहरात सध्या सर्व सुविधांयुक्त असलेल्या मालमत्ता किंवा सदनिका खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच सदनिकांच्या किमतीत वाढ झाली असून, त्यांच्या किमती किमान 50 लाख ते एक कोटींच्या पुढे पोहोचल्या आहेत.

Buildings
Maharashtra SSC Exam Copy Cases: दहावीच्या पहिल्याच पेपरला 11 कॉपीप्रकरणे; पुणे विभागात सर्वाधिक प्रकार

अतिशय खास ठिकाणी सदनिकांच्या किमतीमध्ये अगदी पाच ते सहा कोटींच्या पुढे असल्याचे दिसून आले आहे. याबाबत नाईट फॅंक इंडिया या सर्व्हे करणाऱ्या संघटनेने दिलेल्या अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एक कोटी किमत असलेल्या मालमत्तांच्या नोंदणीत सर्वाधिक वाटा कायम राहिला आहे. जानेवारी 2026 या महिन्यात 50 लाख, एक कोटी ते अगदी अडीच कोटी रुपये या श्रेणीच्या मालमत्तांची मागणी वाढली असून, त्याचा वाटा अनुक्रमे 14 ते 29 टक्के एवढा आहे.

Buildings
AI Mother Language Learning: एआयमुळे मातृभाषा शिकणे झाले सोपे; तरुणाईचा नवा ट्रेंड चर्चेत

या भागात आहे मागणी (सूक्ष्म बाजारपेठा )

  • उत्तर:- जुन्नर , आंबेगाव , खेड

  • दक्षिण:- भोर , पुरंदर, बारामती, इंदापूर

  • पूर्व:- शिरूर, दौंड

  • पश्चिम:- मावळ, मुळशी , वेल्हे

  • मध्यवर्ती:- हवेली, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news