वडगाव शेरी: कल्याणीनगर परिसरात अनेक व्यावसायिकांनी पार्किंगच्या जागेवर व्यवसाय सुरू केला आहे. या ठिकाणी येणारे ग््रााहक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी करीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिक आणि सामाजिक संस्थांनी बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केली आहे.
कल्याणीनगरमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. या कंपनीतील कर्मचारी जेवण आणि नाश्ता करण्यासाठी हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जातात. या व्यावसायिकांनी जास्त फायद्यासाठी पार्किंगच्या जागेमध्ये पोट भाडेकरू ठेवले आहेत. पार्किंगवर बांधकाम करून दुकाने, मोबाईल शॉपी आणि चहा विक्रेत्यांसह विविध व्यावसायिकांना ही जागा भाड्याने दिली आहे. तसेच काही जणांनी पार्किंगमध्ये बांधकाम करून व्यवसाय वाढवले आहेत. या व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग््रााहकांना रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग करावे लागते. यामुळे रस्ते वाहतुकीसाठी अरुंदी होत आहेत.
कल्याणीनगर येथील मारिप्लेक्स मॉल ते सिल्वर ओक, फोर्टीलिजा सोसायटी, लॅडमार्क सोसायटी, जॉगर्स पार्क या रस्त्यांवर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. इमारतीचे बांधकाम करताना प्रत्येक व्यावसायिकांने दुकानाच्या पार्किंगची व्यवस्था केली असते. इमारतीच्या बांधकाम नकाशामध्ये तसा आराखडाही असतो. या सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागकडून संबंधित बांधकामला पुर्णत्वचा दाखला दिला जातो.
मात्र, हा दाखल्या घेतल्यानंतर व्यावसायिक पार्किंगच्या जागेमध्ये धंदा सुरू करतात. पार्किंगच्या जागेवर व्यवसाय करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना व अधिनियम ॲक्ट 1966 नुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलिसाकडून ’नो पार्किंग’मधील वाहनांवर नियमित कारवाई होत नसल्याने रस्त्यांवर वाहने उभी करण्याचा प्रकार परिसरात सर्रास सुरू आहे. याबाबत येरवडा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगिता जाधव यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
वॅले पार्किंगचा धंदा तेजीत
कल्याणीनगरमधील अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे स्वतःची पार्किंग नाही. यामुळे या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग््रााहकांच्या वाहनांचे वॅले पार्किंग महापालिकेच्या रस्त्यावर केली जाते. या पार्किंगसाठी ग््रााहकांकडून पैसे वसूल केले जातात. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.