Maharashtra Cooperative Elections Postponed: राहुरी-बारामतीत सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मेपर्यंत पुढे ढकलल्या

पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय; काही प्रक्रियांना सूट कायम
Elections Voting
Elections VotingPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात सुरु असलेल्या राहुरी (जि.अहिल्यानगर) आणि बारामती (जि.पुणे) या विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या दोन जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका (सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून) शासन आदेशाच्या दिनांकापासून सध्या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक 31 मे 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसे आदेश शासनाच्या निर्णयान्वये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी जारी केले आहेत.

Elections Voting
Maharashtra Sugarcane FRP Dues: ऊस एफआरपी थकीत 4,898 कोटी; शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर

सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले आहे, अशा सहकारी संस्था वगळण्यात आल्या आहेत. शासनाचे अपर निबंधक तथा सहसचिव यांच्या दिनांक 30 मार्चच्या पत्राचा संदर्भ देऊन अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आल्याचे आदेश काढण्यात आल्याचे प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी म्हटले आहे.

Elections Voting
Mission Lakshyavedh Wrestling Scheme: ‘मिशन लक्ष्यवेध’वर कुस्तीगीर संघाचा आक्षेप; योजनेविरोधात आंदोलनाचा इशारा

या आदेशातून काही बाबींना सूट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सहकारी संस्थांच्या निवडणूकीनंतरची पहिली पदाधिकारी निवड करणे. चेअरमन, व्हाईस चेअरमन, अन्य पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देणे अथवा मृत्यु, अपात्र (अनर्हता) या कारणांमुळे रिक्त झालेले चेअरमन, व्हाईस चेअरमन, अन्य पदाधिकारी यांची निवड करणे. राजीनामा, मृत्यू, अपात्र या कारणांमुळे संचालक मंडळातील नैमित्तिकरित्या रिक्त झालेल्या जागेवर अन्य संचालकांची निवड करणे. क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनाचा टप्पा सुरु झाला आहे, अशा सहकारी संस्था आदींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news