लेण्याद्री: जुन्नर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास जुन्नर पोलीस करत आहेत.
पहिली घटना कुरण येथे घडली. येथील शेतकरी ज्ञानेश्वर बबन नवले यांच्या शेतात मजुरीसाठी वास्तव्यास असलेले नारायण कडाळे यांची पत्नी उमा नारायण कडाळे (वय २७) यांनी बुधवारी (दि. ५) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
दुसरी घटना बारव (ता. जुन्नर) येथे घडली. विश्वास दुलाजी निगळे (मूळ रा. हिवरे तर्फे मिन्हेर, सध्या रा. बारव) यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने मंगळवारी (दि. ४) रात्री राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्याचे वडील विश्वास निगळे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन्ही घटनांचा पुढील तपास जुन्नर विभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटी, जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे पोलिस हवालदार एकनाथ पारधी हे करत आहेत. आत्महत्येमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.