Junnar Cannabis Cultivation Pudhari
पुणे

Junnar Cannabis Cultivation: जुन्नरमध्ये गहू-बाजरीत लपवून गांजाची लागवड; पोलिसांची कारवाई

इंगळून येथे ५० हजारांचा गांजा जप्त; शेतकऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील इंगळून येथे गहू व बाजरीच्या पिकाच्या मध्यभागी गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये ५० हजार रुपये किमतीचा गांजा पकडण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली. ही कारवाई शनिवारी (दि. २८) करण्यात आली.

जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या गांजाच्या उत्पादन व विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह जुन्नर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसोबत संबंधित ठिकाणी छापा टाकला. पाहणी दरम्यान गहू व बाजरीच्या शेतामध्ये लपवून गांजाची झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले. ज्या शेतामध्ये गांजाची झाड आढळली ते शेत इंगळून येथील दिनकर विठ्ठल डामसे (वय ६०) यांचे असल्याचे निष्पन्न झालेआहे.

त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गांजाची लागवड केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अजित गेंगजे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच जुन्नर पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण अवचर,

सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, अरविंद गाटकुळ, रघुनाथ शिंदे, ऋषिकेश तिटमे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमिन, जुन्नरचे पोलिस हवालदार सागर हिले, सागर शिंदे, गणेश शिंदे, अजित गेंगजे, संतोष पठारे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT