पुणे : खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला जागतिक पातळीवरील टी-फोर एज्युकेशन संस्थेमार्फत देण्यात येणारा ‘वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज’ (जगातील सर्वोत्तम शाळा-लोकनियुक्त पसंती पुरस्कार) हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला आहे.(Latest Pune News)
टी-फोर एज्युकेशन संस्थेमार्फत दरवर्षी ‘वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज’ ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये ’लोकसहभागातून शाळा विकास’ या विभागात जालिंदरनगर शाळेने सहभाग घेतला होता. जगभरातील लाखो शाळांमधून जालिंदरनगर शाळेची निवड झाली असून तिला 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. मंगळवारी (दि. 30) उशिरा ऑनलाइन पद्धतीने विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण 15 नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे होणार आहे.
हा पुरस्कार शाळेच्या नवकल्पना, सामाजिक प्रभाव आणि विद्यार्थी विकासासाठीच्या योगदानाबद्दल दिला जातो. जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मिळविण्यामागे शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ ठरल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले. त्यांच्या गुणवत्तेमुळे शाळेचा तसेच पुणे जिल्ह्याचा नावलौकिक महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारतीय उपखंडात पोहचला आहे.
जालिंदरनगर प्राथमिक शाळेत राबविण्यात आलेल्या सहअध्ययन पद्धतीने शैक्षणिक क्रांतिकारक बदल घडवून आणला आहे. विविध वयोगटातील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात व शिकतात, ही पद्धत जगभरातील शाळांसाठी प्रेरणादायी आहे, असे शिक्षक दत्तात्रय वारे यांनी सांगितले.शाळेत नवे प्रयोग
या शाळेत आंतरराष्ट्रीय स्तराचे दर्जेदार शिक्षण दिले जाते. हा निकाल शाळेच्या जागतिक स्तरावर यश मिळवण्याचा आत्मविश्वास वाढवणारा असून सरकारी शिक्षण व्यवस्थेलाही नवा आत्मविश्वास देणारा आहे. शाळा ही लोकसहभागावर आधारित असून, येथे मराठी, हिंदी, इंग््राजीबरोबरच जपानी भाषा शिकवली जाते. पुढील काळात जर्मन भाषा देखील सुरू करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार केवळ सन्मान नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. यासाठी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभारगजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे
खेडेगावातील एका लहानशा सरकारी शाळेत कार्यरत असताना अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणे आणि नामांकित खासगी शाळांशी खांद्याला खांदा लावून उभे राहणे ही आमच्यासाठी स्वप्नपूर्तीच आहे. हा पुरस्कार हे सिद्ध करतो की सरकारी शाळांतही प्रचंड क्षमता दडलेली आहे.दत्तात्रय वारे, शिक्षक शाळेत नवे प्रयोग