पुणे

पुणे : पांगुळ आळीत लोखंडी सांगाडा कोसळला; मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेश पेठेत ध्वनियंत्रणा तसेच प्रकाश योजनेसाठी लावलेला लोखंडी सांगाडा कोसळून चार जण गंभीर जखमी झाल्याप्रकरणी मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा केला आहे. याप्रकरणी श्रीकृष्ण मंडळाचे राहुल चव्हाण, अजय बबन साळुंखे, गोपी चंद्रकांत चव्हाण (तिघे रा. पांगुळ आळी, गणेश पेठ), चेतन ऊर्फ सनी समाधान अहिरे (रा. खराडी, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश लालचंद चंगेडिया (वय 38, रा. नाना पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेत मंदा लालचंद चंगेडिया (वय 67), निर्मलादेवी नवीन पुनमिया (वय 69), केवलचंद मांगीलाल सोलंकी (वय 66), ताराबाई केवलचंद सोलंकी (वय 64) जखमी झाले आहेत.

गणेश पेठेतील पांगुळी आळीत सादडी सदन आहे. जैनधर्मीयांच्या चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सादडी सदनच्या प्रवेशद्वारासमोर पांगुळ आळीतील श्रीकृष्ण मंडळाकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. गुरुवारी (7 सप्टेंबर) सादडी सदनच्या प्रवेशद्वारासमोर श्रीकृष्ण मंडळाने ध्वनी आणि प्रकाश योजनेसाठी मोठा लोखंडी सांगाडा उभा केला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास सादडी सदनच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडणार्‍या मंदा चंगेडिया, निर्मलादेवी पुनमिया, केवलचंद सोलंकी, ताराबाई सोलंकी यांच्या अंगावर लोखंडी सांगाडा कोसळळा. दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT