Pune International Cycling Competition Pudhari
पुणे

Pune International Cycling Competition: आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यात 300 किमी दर्जेदार रस्ते तयार

जगभरातील 25 देशांतील सायकलपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची पायाभूत सुविधा पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहर जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागात होणाऱ्या आंतर राष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी सुमारे तीनशे किलोमीटरचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नियमानुसार गुणवत्ता पूर्ण असलेले रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार केले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पुणे शहर, जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतीने काही खासगी प्रायोजक यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील 25 देशांतील नावाजलेले सायकल स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील भोर, वेल्हा. मुळशी, पुरंदर, मावळ, हवेली या तालुक्यातील काही भागातील रस्ते स्पर्धेसाठी तयार केले आहेत.

या सहा तालुक्यांतील सुमारे 300 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामासाठी पीएमआरडीए (194 कोटी), जिल्हा नियोजन समिती (77 कोटी) आणि शासन (23 कोटी) या विभागांनी सुमारे 294 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामधून 100 कि.मी.चे रूंदीकरण, उर्वरित 200 किलोमीटरचे मजबुतीकरण, डांबरीकरण, आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नियमानुसार केले आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत होणाऱ्या स्पर्धेच्या रस्त्यासाठी या दोन्ही प्रशासनाने निधी खर्च केला आहे.

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तयार केलेल्या रस्त्यांसाठी सिमेंट बेस ट्रिटेंट पद्धतीचा वापर करून पायाचे काम केले. त्यानंतर डांबरीकरण केले आहे. यामुळे या रस्त्यांच्या कामांची गॅरंटी पाच वर्षे आहे.

कामासाठी तत्त्वेे निश्चित

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी रस्ता तयार करण्यापूर्वी या स्पर्धेसाठी असलेली आंतरराष्ट्रीय मानके काय आहेत. पायाभूत सुविधा कशा आहेत. याचा अभ्यास करून कामासाठी तत्वे निश्चित करण्यात आली आहेत.

रस्त्याची ठळक वैशिष्ठ्ये

  • रस्त्याची गुणवत्ता राखण्यासाठी त्रिस्तरीय निगराणी

  • कमी कालावधीत काम पूर्ण

  • रस्त्यावरील वळण, खोलगट भाग पूर्णपणे संरक्षित जाळ्या

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी जगभरातील 25 देशांमधील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वार्थाने रस्ते सुरक्षित होण्यासाठी दक्षता घेतली आहे. तसेच, गुणवत्तापूर्ण काम होण्यासाठी विशेष पथके व सल्लागार यांच्या नेमणुकीच्या माध्यमातून रस्त्याच्या कामांची तपासणी केली आहे.
भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT