Pune Municipal Election Manifesto: पुणे महापालिका निवडणूक जाहीरनामे : आश्वासनांची खैरात, पक्षनिहाय तुलना

पाणी, वाहतूक, पर्यावरण ते आरोग्य; प्रमुख पक्षांच्या योजनांचा सविस्तर आढावा
Pune Municipal Election Manifesto
Pune Municipal Election ManifestoPudhari
Published on
Updated on

सुनील माळी

पुणे: महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या सर्व प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यात मतदारराजावर आश्वासनांची, योजनांची खैरातच केल्याचे दिसून येते आहे. या जाहीरनाम्यांची तपासणी केली असता महापालिकेशी संबंधित योजना-कामांची तपशीलवार मांडणी करण्यात शिंदे शिवसेनेने बाजी मारल्याचे तसेच त्याखालोखाल संयुक्त राष्ट्रवादी काँग््रेास आणि काँग््रेासच्या जाहीरनाम्यांमध्ये सविस्तर तपशील असल्याचे स्पष्ट होते. भारतीय जनता पक्षाने पहिल्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवर विशेष भर दिला असून, नंतर येत्या पाच वर्षांतील कामांची मांडणी केली आहे.

Pune Municipal Election Manifesto
Baramati Maha Discom Cyber Fraud Alert: सायबर फसवणूक वाढली; महावितरणकडून बारामतीतील वीजग्राहकांना सतर्कतेचे आवाहन

प्रमुख पक्षांनी विविध कामे आणि योजनांच्या केलेल्या मांडणीपैकी पाणी, घनकचरा, वाहतूक, पर्यावरण, आरोग्य, झोपडपट्‌‍ट्या आदींसाठीच्या तरतुदींची तुलना केली असता अनेक समान बाबी स्पष्ट होतात, तसेच काहींचे वेगळेपणही जाणवते. ही तुलना पुढीलप्रमाणे -

वाहतूक

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  • यवत, खेड-शिवापूर, पानशेत, सासवडपर्यंत मेट्रो नेणार.

  • मेट्रो स्टेशनपाशी पार्किंग व्यवस्था करणार.

  • सर्व बसगाड्या इलेक्ट्रीकच्या असणार, रात्रसेवा सुरू करणार.

  • महिलांना तिकिटाचा निम्मा दर आकारणार.

  • गर्दीच्या वेळी महिला स्पेशल बस चालू करणार.

राष्ट्रवादी काँग््रेास

  • मेट्रोप्रवास मोफत करणार, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देणार

  • पीएमपी - मोफत बससेवा तसेच फीडर बससेवा देणार

भाजप

  • येत्या पाच वर्षांत आणखी 120 किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग विकसित करणार

  • 4000 इलेक्ट्रीक बस घेणार.

  • 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत बससेवा देणार

काँग््रेास

  • मेट्रोचे आगामी मार्ग वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष देणार

  • पीएमपी बस पाच हजारांपर्यंत वाढवणार.

  • फीडर बससेवा सुरू करणार.

  • महिलांना मोफत प्रवास देणार

शिवसेना (उबाठा)-मनसे

  • मेट्रो स्थानकाजवळ प्रशस्त वाहनतळ उभारणार, नवीन मार्गांवर भर देणार.

  • प्रत्येक 5 कि.मी.साठी 5 रुपये, विद्यार्थी 50 टक्के सवलत

पाणी

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  • प्रतिमाणसी 135 लिटर पाणी देणार, टँकरमुक्ती करणार.

  • टाटा धरणातून पाणी आणणार.

राष्ट्रवादी काँग््रेास

  • उच्चदाबाने दररोज पाणीपुरवठा करणार. टँकरमाफियांचे उच्चाटन होणार.

  • पाण्याची झीरो गळती योजना राबवणार. मुळशी धरणातून 7 टीएमसी देणार.

भाजप

  • समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र पाणीयोजना राबवणार.

  • सांडपाणी प्रक्रिया केंद्रे विकसित करणार.

काँग््रेास

  • समान पाणीयोजना राबवणार.

  • गावांतील पाणी योजना पूर्ण करणार.

शिवसेना (उबाठा)-मनसे

  • समान पाणी योजना योजनेकडे लक्ष देणार.

  • मुळशी धरणातून पाणी आणणार. पाण्याची गळती थांबवणार

Pune Municipal Election Manifesto
Velhe Bank Cashier Honesty: साखर बँकेत प्रामाणिकतेचा आदर्श; जादा 20,700 रुपये ग्रामपंचायतीला परत

पर्यावरण

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  • जैववैविध्य उद्यानांचे जतन करणार. दरवर्षी पाच लाख झाडे लावणार.

  • डोंगरावर बांधकामांना बंदी करणार. मोफत रोपेवाटप करणार.

  • उसाच्या फडात पकडलेल्या बिबट्यांचे प्राणिसंग््राहालय उभारणार.

राष्ट्रवादी काँग््रेास

  • नाले-ओढे बुजवण्यावर कडक निर्बंध आणणार.

  • हरित क्षेत्र संवर्धन योजना सुरू करणार.

भाजप

  • 800 ॲमिनिटी स्पेसेस या ग््राीन स्पेसेस म्हणून विकसित करणार.

  • ग््राीन सिटी व्हिजन योजना राबवणार. धूळ रोखण्यासाठी उपाय करणार.

  • कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई सुरू करणार. जुन्या वाहनांवर कारवाई होणार.

  • हरित क्षेत्र संवर्धन, ग््राीन बिल्डिंग मानकांचे पालन करणार.

  • हवेतील पीएम 2.5 आणि 10 हे प्रदूषणाचे प्रमाण आठ दहा टक्के घटवणार.

  • सर्व पथदिवे सोलर पद्धतीचे असणार, मुख्य चौकांत इंडस्ट्रीयल एअर प्युरिफायर्स बसवणार

काँग््रेास

  • प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणणार.

  • प्रतिमाणशी झाडांची संख्या आठपर्यंत वाढवणार.

  • टेकड्यांचे तसेच मोकळ्या जागांचे जतन करणार.

  • डोंगर फोडून रस्ते करण्याच्या योजनांना विरोध करणार

शिवसेना (उबाठा)-मनसे

  • टेकड्यांचे संरक्षण होणार.

  • वृक्षलागवड करणार, हवाप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न होणार,

  • कचरा व्यवस्थापन

  • शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  • कचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया करणार. कागदी-कापडी पिशव्या मोफत देणार.

  • सोसायट्यांमध्ये गांडूळखत प्रकल्प उभारण्यास सांगणार.

  • शहराच्या चारही बाजूंना कचराप्रक्रिया केंद्रे असणार.

कचरा व्यवस्थापन

राष्ट्रवादी काँग््रेास

  • कचराप्रक्रिया योजनेत इंदूरला मागे टाकणार.

  • शहरातील कचऱ्याचे 100 टक्के वर्गीकरण करणार.

  • कचरा जिरवणाऱ्या सोसायट्यांना वीस टक्के सवलत देणार.

भाजप

  • बंद कचरा प्रकल्प पुन्हा सुरू करणार.

  • झिरो वेस्ट सिटी योजना सुरू करणार.

  • -वर्गीकरणासाठी मोहीम राबवणार

काँग््रेास

  • प्रभागस्तरावर प्रक्रिया केंद्रे उभारणार.

  • वीज-खत प्रकल्प सुरू करणार

  • शिवसेना (उबाठा)-मनसे

  • शहराच्या चारही बाजूंना आधुनिक कचराप्रक्रिया प्रकल्प असणार

करमाफी

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

कोणतीही करवाढ करणार नाही.

राष्ट्रवादी काँग््रेास

500 चौरस फुटांपर्यंतची घरे मालमत्ता करमुक्त

भाजप

  • पाचशे चौरस फुटांखालील आर्थिक दुर्बल कुटुंबांचा मालमत्ता कर माफ करणार.

  • 40 टक्के मालमत्ता कर सवलत पाच वर्षे सुरू राहणार

काँग््रेास

  • पाचशे चौरस फुटांपर्यंतची घरे करमुक्त,

  • मालमत्ता कर बाकीवरील दंडव्याज एक टक्क्यावर.

Pune Municipal Election Manifesto
Baramati Career Sansad: शारदाबाई पवार महाविद्यालयात करिअर संसद अधिवेशन; आधुनिक कौशल्यांवर भर

झोपडपट्‌‍ट्या

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  • 550 चौरस फुटांचे घर मोफत देणार.

  • पाच वर्षांत झोपडपट्टीमुक्तता, फोटोपास तसेच रोजगार योजना राबवणार

राष्ट्रवादी काँग््रेास

  • झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कक्षाची स्थापना करणार.

  • तीन वर्षांत प्रकल्पांची पूर्तता करणार, ते त्या मुदतीत न झाल्यास झोपडीधारकांना दुप्पट भाडे देणार

भाजप

  • झोपडपट्टीवासीयांना वीज, पाणी, शौचालये, गॅस देणार.

  • 300 लोकसंख्येमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह पुरवणार.

शिवसेना (उबाठा) - मनसे

  • झोपडवासीयांचे दर्जेदार पुनर्वसन करणार.

  • झोपडपट्टीमुक्त पुणे योजना राबवणार

आरोग्य

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  • प्रत्येक प्रभागात ‌‘हिंदुहृदयसमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना‌’ सुरू करणार.

  • ज्येष्ठांना मोफत औषधे देणार.

  • प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 बेड्‌‍सची रुग्णालये तसेच 2 प्रसूतिगृहे उभारणार.

  • सर्व विधानसभा क्षेत्रांत फिरता दवाखाना सुरू करणार

राष्ट्रवादी कॉंग््रेास

  • शहरातील वेगवेगळ्या भागांत 200 राजमाता जिजाऊ क्लिनिक उघडणार.

  • वाघोली भागात 500 खाटांचे, मगरपट्टा-हडपसर येथे 300 खाटांचे, वारजे 350 खाटांचे, कोंढवा-

  • येवलेवाडी-महंमदवाडी येथे 250 खाटांचे रुग्णालय सुरू करणार.

  • सध्याची महापालिकेच्या रुग्णालयांतील सध्याची खाटांची 425 संख्या 2800 पर्यंत वाढवणार

भाजप

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांशी संलग्नित 700 बेड्‌‍सचे रुग्णालय उभारणार.

काँग््रेास

  • प्रत्येक प्रभागात 24 तासांचे आरोग्य केंद्र सुरू करणार. मोफत तपासणी योजना राबवणार.

  • ज्येष्ठांसाठी घरपोच सेवा तसेच हेल्थ कार्ड योजना सुरू करणार.

शिवसेना (उबाठा)-मनसे

  • प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुसज्ज रुग्णालये सुरू करणार.

  • पिवळ्या केशरी कार्डधारकांना मोफत आरोग्यसेवा देणार

Pune Municipal Election Manifesto
Pune Innovate U Techathon 2026: ‘इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0 – 2026’ : राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन

भाजपची कामगिरी : काही पूर्ण, काही अपूर्ण

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीनंतर पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने गेल्यावेळच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांपैकी काहींची पूर्तता झाली आहे. काही कामे सुरू आहेत, तर काही योजना सुरूच झालेल्या नाहीत.

भाजपच्या 2017 मधील जाहीरनाम्यातील तरतुदींचा आढावा :

  • पुणे स्मार्ट सिटी होणार - योजना गुंडाळली

  • 50 मार्गांवर महिला-कामगार-दुर्बल घटकांना मोफत पीएमपी, एका महिन्याच्या पासमध्ये दुसऱ्या महिन्याचा पास मोफत, सीएसआरमधून बसगाड्या - नाही

  • विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक जाहीर करणार - नाही

  • रिंग रोडला चालना - या योजनेला चालना मिळाली

  • मेट्रोला चालना - मेट्रो योजना प्रगतिपथावर

  • शहरभर बीआरटी जाळे - योजना सुरू झालेली नाही

  • समान पाणीयोजना - सर्व नळजोडांना मीटर - ही योजना अर्धवट आहे

  • नदी सुधार योजना - चालू आहे

  • ॲमिनिटी स्पेसची यादी प्रसिद्ध करणार - अद्याप अपूर्ण

  • प्रत्येक प्रभागात एक-दोन टनांचे ओला कचरा प्रकल्प करणार - अद्याप अपूर्ण

  • प्रत्येक प्रभागात आरोग्य केंद्राची उभारणी - अपूर्ण

  • प्रत्येक प्रभागात कौशल्यविकास प्रशिक्षण केंद्र करणार - अपू्‌‍र्ण

  • प्रत्येक प्रभागात महिला स्वच्छतागृह - अपूर्ण

  • ऐतिहासिक आणि वारसा वास्तूंची माहिती देण्यासाठी टुरिस्ट गाईड - अपूर्ण

  • प्रत्येक प्रभागात योग केंद्र - अपूर्ण

  • प्रत्येक प्रभागात मंडई, आठवडे बाजार - अपूर्ण

  • प्रत्येक प्रभागात अग्निशमन केंद्र, जागा जाहीर करणार - अपू्‌‍र्ण

  • सर्व शालेय साहित्य वेळेत मिळणार - गणवेश मिळाले नाहीत. ई-लर्निंग संच इंटरनेटअभावी बंद

  • पुणे वायफाय - अपू्‌‍र्ण

  • क्रीडांगणांचा विकास - अपूर्ण मिळकत कर 20 टक्के सवलत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news