पुणे

Pune Yerwada jail : येरवडा कारागृहात पुन्हा कैद्यावर हल्ला; पत्र्याच्या तुकड्याने वार

अमृता चौगुले

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा हल्ला केल्याची घटना घडली आहे. येरवडा कारागृहात एका कैद्याने दुसर्‍यावर पत्र्याच्या तुकड्याने हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी अकराच्या सुमारास सर्कल एक, बॅरॅक क्रमांक आठच्या पडवीमध्ये घडली. ऋषभ शेवाळे असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी, पोलिस शिपाई संतोष मोहन जगताप (वय 49) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार न्यायबंदी रोहन अविदास माने (रा. सूर्यनगर बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ शेवाळे हा तेथे उभा असताना, आरोपी माने याने अचानक येऊन त्याच्या खिशातील पातळ पत्र्याच्या तुकड्याने शेवाळे याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये शेवाळे याच्या गालावर आणि भुवईला जखम झाली आहे. हा प्रकार कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी संतोष जगताप यांच्या निदर्शनास आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काटे करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT