पुणे

पुणे बाजारसमितीत दुरुस्तीच्या नावाखाली बांधले पक्के गाळे!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गुलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा विभागात शेडच्या दुरुस्तीच्या नावाखाली आडतदारांनी खासगी खर्चातून पक्क्या गाळ्यांचे बांधकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

केवळ 30 जणांसाठी हे गाळे असून, यासाठी महापालिका, पणन विभाग, बाजार समितीची कोणतीही लेखी परवानगी नसल्याचे समोर आले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा विभागात कांद्याची आवक जास्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वी तात्पुरता मंडप घातला जात असे. महिनाभरानंतर हा मंडप काढला जात असे. आता हे मंडप काढून तेथे पक्क्या स्वरूपाच्या गाळ्यांची बांधणी झाली आहे. मागील आठवड्यात सलग चार सुट्यांचा फायदा घेत सरकारी कार्यालय कारवाई करण्यापूर्वी मिक्सर टँकर बोलावून युद्धपातळीवर काम पूर्ण करीत पक्के बांधकाम उभारले आहे. या प्रकाराबाबत बाजार समितीच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता आम्हाला कल्पना नसल्याचे सांगत आहे.

कांदा विभागातील मंडप दुरुस्तीसाठी आडते असोसिएशनने मागणी केली होती. मात्र, पक्क्या स्वरूपात बांधकामाची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

                                       – मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

हेही वाचा

SCROLL FOR NEXT