पुणे

पुणे : डॉ. रामोडकडे कोट्यवधींची माया; हॉटेल, सदनिका, भूखंड, जमीन…

अमृता चौगुले

पुणे : आठ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेल्या विभागीय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोडची कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले. सीबीआयने त्याची सखोल तपासणी सुरू केली असून, आणखी काही मालमत्ता आहेत का? याचाही तपास सुरू आहे. रामोडला अटक केल्यानंतर सीबीआयने मारलेल्या छापेमारीत तीन ठिकाणांवरून 6 कोटी 64 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच कार्यालयातून एक लाखाहून अधिक रक्कम जप्त केली आहे.

त्यापाठोपाठ डेक्कन येथे एक हॉटेल आणि एक सदनिका आहे. बाणेर येथे एक सदनिका, छत्रपती संभाजीनगर येथे सदनिका आणि भूखंड आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील मूळ गावी जमीन असून, त्याचे बाजारमूल्य सुमारे 15 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. रामोडने अजून किती ठिकाणी मालमत्ता घेतल्या आहेत. तसेच अन्यत्र कुठे रोख रक्कम ठेवली आहे का, याची चौकशी करण्यासाठी सीबीआयने पोलिस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, रामोडने अपर आयुक्त म्हणून दोन वर्षांत मोठी माया जमविल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुुरू आहे.

पत्नीच्या नावे कंपनी?

उत्पन्न, मिळकती तसेच जमिनीसंदर्भातील कागदपत्रे सीबीआयला मिळाली आहेत. संबंधित कागदपत्रे वेदलक्ष्मी डेव्हलपर्स अ‍ॅण्ड डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहेत. ती कंपनी रामोडच्या पत्नीच्या नावे नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT