मेखळी/काटेवाडी : पुणे ग्रामीण पोलिस दलाचा उपक्रम असणाऱ्या ग्रामसुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील 1 हजार 195 गावे सहभागी आहेत. जिल्ह्यातील 11.17 लाख नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत. आजवर जिल्ह्यात 33 हजार 893 वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे. एकूणच ग्रामसुरक्षा यंत्रणेचा नागरिकांना लाभ झाला असल्याचे दिसून येत आहे.
संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600 किंवा 9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जात असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा यशस्वी वापर करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहेत.
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम/घटना विनाविलंब नागरिक/ग्रामस्थांना एकाच वेळी
कळवणे व अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलिस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
संपूर्णपूर्ण स्वयंचलित यंत्रणा.
गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत.
संपूर्ण भारतासाठी एकच टोल फी नंबर 18002703600 किंवा 9822112281.
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्तीकाळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीवता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरीत्या प्रसारित होतात.
नियमाबाह्य दिलेले संदेश/अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावाच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
वाहनचोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किलोमीटर परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
घटनेच्या तीवतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही, तोपर्यंत रिंग वाजते.
संदेश पुढील 1 तास पुन्हा-पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर ब्लॅक लिस्ट होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचे संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये/पोलिस ठाणे आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना/आदेश देता येणे शक्य होत आहे.