पुणे

रस्त्यावर कचरा अन् मैलापाणी; शास्त्रीनगर भागात कचरा समस्या बिकट

Laxman Dhenge

कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : कोथरूडमधील शास्त्रीनगर भागातील मारणे चाळ, सागर कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी येथे कचरा उघड्यावर पडत असून, तो वेळेवर उचलला जात नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. दोन दिवसात समस्या सुटली नाही, तर कोथरूड क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रहिवासी व भाजप प्रभाग अध्यक्ष कैलास मोहोळ यांनी दिला आहे.

या ठिकाणी बैठी घरे मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या महिन्यापासून कचरा रस्त्यावर पडलेला आहे. यामुळे येथून चालणे नागरिकांना अवघड झाले आहे. या कचार्‍याच्या दुर्गंधीमुळे रहिवाशांना घरात बसणेही कठीण झाले आहे. अनेकदा येथे डुकरे, कुत्री कचर्‍यावर ताव मारत असलेले दिसत असतात. तसेच हवेमुळे कचरा परिसरात पसरत असल्याने लहान मुलांना घराबाहेर सोडणे कठीण झाले असल्याची तक्रार महिलावर्गाने दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितली.

आरोग्य विभागाला कळविले असता ते म्हणतात, आज कचरा उचलला जाईल. परंतु, प्रत्यक्षात कचरा उचलला जात नाही. अनेकदा कर्मचारी नाही, ते सुटीवर गेले आहेत अशीदेखील उत्तरे मिळत असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. याबाबत कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त केदार वझे यांना विचारले असता ही समस्या लवकर सुटेल व कायम स्वच्छता ठेवण्यात येईल, असे

पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने होत आहे. त्यामध्ये उपनगरांमधील पायाभूत व सामाजिक प्रश्न डोके
वर काढतात. त्यामुळे शहरातील बकालपणा समोर येतो. कोथरूडमधील रस्त्यांवर कचरा आणि बिबवेवाडीतील रस्त्यावर आलेल्या मैलापाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्वसामान्य समस्या प्रशासन कसे सोडविणार आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT